Sunny Deol Lahore 1947 New Update : ‘गदर 2’ मध्ये (Gadar 2) राडा घातल्यानंतर आता सर्वांच्या नजरा सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. सनी देओल सतत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो. आता त्याचा आगामी ‘लाहोर 1947’ हा (Lahore 1947 Movie) चित्रपट चर्चेचा भाग बनला आहे. (Social Media) सनीचा हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘लाहोर 1947’शी संबंधित आता नवीन अपडेट समोर आली आहे.
या चित्रपटात सनी देओल, राजकुमार संतोषी आणि आमिर खान हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओलचा चित्रपट ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी निर्माते प्रत्येक महत्त्वाच्या घटकाची भर घालताना दिसत आहेत. ‘लाहोर 1947’ चे डीओपी आणि कॅमेरामन म्हणून या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने संतोष सिवन यांच्याकडे लगाम सोपवली आहे.
कॅमेरामनबद्दल, राजकुमार संतोषी यांनी सांगितले आहे की, “त्यांच्याकडे लाहोर 1947 चा कॅमेरामन/डीओपी म्हणून संतोष सिवन आहे. तो सध्या देशातील सर्वात मोठा कॅमेरामन आहे. “याआधी, संतोष आणि त्याने दोन चित्रपटात एकत्र काम केले होते.” राजकुमार संतोषीच्या म्हणण्यानुसार, संतोष सिवनने पुकार आणि बरसात या चित्रपटांमध्ये कॅमेरामनची जबाबदारीही घेतली आहे. शिवाय त्यांनी हॅलो नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे.
Saif Ali Khan: ‘सैफ अली खानच्या मुलाला व्हायचंय….’; अभिनेत्याने थेटच सांगून टाकलं
राजकुमार संतोषी आणि संतोष सिवन यांची जुनी मैत्री आहे. दोघेही सनी देओलच्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. ‘लाहोर 1947’ हा खास चित्रपट असणार आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शकानी सांगितले आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा मोठा प्रकल्प असून त्याच्याशी त्याच्या भावनाही जोडलेल्या आहेत. या चित्रपटापूर्वी त्याने आमिरसोबत ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात काम केले होते आणि तो निर्माता म्हणून धुरा सांभाळली होती.