Gadar 2 OTT Release: चाहत्यांसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी OTT वर प्रदर्शित होणार गदर 2

Gadar 2 OTT Release: चाहत्यांसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी OTT वर प्रदर्शित होणार गदर 2

Gadar 2 OTT Release: सनी देओलचा चित्रपट गदर 2 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच आहे. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या गदर 2 ला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. शाहरुख खानचा जवान रिलीज झाल्यानंतरही गदर 2 च्या यशाचा सिलसिला कायम आहे. गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

गदर 2 चे चाहते OTT वर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता गदर 2 च्या ओटीटी रिलीझची तारीख समोर आली आहे. OTT Play नुसार, गदर 2 ZEE5 OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या तारखेला प्रसिद्ध होईल
गदर 2 चा OTT प्रीमियर 6 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून केवळ चार आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता, परंतु गदर 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होता, त्यामुळे त्याला OTT प्लॅटफॉर्मवर येण्यास विलंब होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचे आगमन

गदर 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 कोटींची कमाई केली होती. आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात 517.28 कोटींचा व्यवसाय केला आहे. गदर 2 ने जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरचा बाप्पा, वर्षा निवासस्थानी बाप्पाची स्थापना

गदर 2 बद्दल बोलायचे तर हा 2001 मध्ये आलेल्या गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. गदर एक प्रेम कथामध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही अनिल शर्माने तेच जुने कलाकार ठेवले आहेत. गदर 2 मध्ये मनीष वाधवा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube