Super Dancer : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ (Super Dancer) या डान्स रियालिटी शोचे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर आता पुनरागमन होत आहे. 19 जुलैपासून सुरू होत असलेला हा शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशातील 12 असामान्य बाल-प्रतिभा सादर होतील. या सीझनमध्ये डान्सच्या सोहळ्यापेक्षा अधिक काहीतरी असणार आहे.
यामध्ये या छोट्या स्टार्सच्या मागे असलेल्या प्रेरणा स्रोतांवर देखील प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा प्रेरणा स्रोत म्हणजे या कलाकारांची माता. आपल्या मुलामधील प्रतिभा ओळखून त्याच्या कलागुणांना खत पाणी घालून त्यांची कक्षा वाढवण्याचे काम करणारी त्यांची आई त्यांच्या प्रत्येक टप्प्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. हा सीझन त्यांचा खंबीर आधार आणि निष्ठा याची साक्ष देणारा असेल.
आपला उत्साह व्यक्त करताना परीक्षक शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) म्हणते, “एका स्पर्धकाच्या मंचापर्यंतच्या प्रवासाव्यतिरिक्त अन्य बाबीवर प्रकाश टाकणे ही कोणत्याही रियालिटी शोसाठी दुर्मिळ गोष्ट आहे. या सीझनमध्ये, सुपर डान्सर या कार्यक्रमात स्पर्धकांच्या आईचा प्रेरणादायक प्रवास देखील दाखवण्यात येणार आहे. मी स्वतः एक आई असल्यामुळे मी हे जाणते की, पत्नी, मुलगी, बहीण वगैरे भूमिका निभावताना मातृत्वाला नेहमी प्रधानक्रम असतो.
आपले मूल हे नेहमीच आपल्या जीवनाचा आणि हृदयाचा केंद्रबिंदू असते. आपण मंचावरील गुणी मुलांचे कौतुक करतो, पण तितकेच कौतुक त्यांच्या आईचे देखील व्हायला हवे.
शिंदेंचा शिलेदार गोत्यात; आमदार शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, स्वतः दिली माहिती
सर्व मुलांच्या वतीने मी अशा प्रत्येक मातेचे आभार व्यक्त करते कारण, “मुलांच्या यशाच्या मागील खरी प्रेरणा आईच असते.” असामान्य परफॉर्मन्स आणि जिद्द, बलिदान आणि स्वप्नांच्या हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सुपर डान्सर येत आहे. सुपर डान्सर 19 जुलैपासून दर शनि-रवी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर.