Download App

Swapnil Joshi : स्वप्नील लव्ह ट्रँगल बदलून दिसणार ‘या’ सहा खास अभिनेत्री सोबत

Swapnil Joshi New Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) ओळखला जातो. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने आज मराठी मालिका, चित्रपट, सोबतच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (Marathi Movie) स्वप्नील जोशी झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्याची ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. पण आता स्वप्नील नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि त्याचा “बाई गं” (Bai G Movie) हा चित्रपट देखील तितकाच वेगळा आणि खास आहे.

स्वप्नीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याचा आगामी चित्रपटाबद्दल चर्चा केली. अभिनेत्याने सांगितलं आहे की, येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल 6 अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं मध्ये दिसणार आहे. कायम लव्ह स्टोरी करताना लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे आणि मी वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्री सोबत दिसणार आहे. विभिन्न विचाराच्या आणि विविध वयोगटातील अभिनेत्रीसोबत काम करण्याचा अनुभव देखील तितकाच कमालीचा होता.

Aranmanai 4 गाण्याचा प्रोमो आऊट! तमन्ना- राशी चा दिसला खास अंदाज

या सहा अभिनेत्री सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अश्या अफलातून अभिनेत्रीची फौज बाई गं मध्ये दिसणार आहे. आता स्वप्नीलच्या ” बाई गं ” बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असून लवकरच स्वप्नील या बद्दल सांगणार आहे. 2024 ची सुरुवात स्वप्नील “नाच गं घुमा” पासून करत असून येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समधून दिसणार यात शंका नाही.

सध्या स्वप्नील त्याची निर्मिती असलेल्या “नाच गं घुमा” चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि येणाऱ्या काळात तो प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करणार यात शंका नाही. याबरोबर नव्या वर्षात अनेक प्रोजेक्टमधून भेटीला येणार आहे. या सगळ्यात त्यानं न चुकता अयोध्येतल्या रामलल्लाचही दर्शन घेतलं.

follow us

वेब स्टोरीज