Download App

Swara Bhaskar: लग्नाच्या चार महिन्यातच स्वरा भास्कर प्रेग्नंट? काय आहे गुपित घ्या जाणून…

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत एक माहिती समोर आली आहे. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.

परंतु, आता त्यापाठोपाठ लग्नाच्या ४ महिन्यांमध्येच स्वरा प्रेग्नंट असल्याची चर्चा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वरा भास्कर प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. जुलै महिन्यामध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. या ट्वीटवर स्वराला ट्रोल करण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच त्या वृत्तवाहिनीने या सर्व अफवा असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.


नेमकं काय होते ट्वीटमध्ये?
‘बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्तर प्रेग्नंट आहे. तिचा पती फवाद अहमदने याबाबत माहिती दिली असल्याची सांगितले होते. अभिनेत्री जुलै महिन्यामध्ये बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. स्वराने ८ वर्षांनी लहान फवादशी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली’ या आशयाचे ट्वीट एका वृत्तवाहिनीने केले होते.

सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल झाले आहे. त्यानंतर काहीच वेळामध्येच त्या वृत्तवाहिनीने ‘अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधीत करण्यात आलेले ट्वीट हे फेक असल्याचे सांगितले आहे. असे कोणतेही ट्वीट आम्ही केले नाही’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

अभिनेत्री स्वरा भास्कर विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली होती. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तिने सांगितले की, समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे.

Tags

follow us