Download App

Swara Bhaskar च्या वेडिंग पार्टी कार्डवर इन्कलाब जिंदाबादचा स्लोगन ‘हे’ आहे कारण…

मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता ती आणकी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली होती. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला.

16 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकल्यानंतर आता स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीचं निमंत्रण देण्यासाठी एक वेडिंग पार्टी कार्ड डिझाईन करण्यात आलं आहे. एका इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाच्या पार्टीचं वेडिंग पार्टी कार्ड पोस्ट केलं आहे.

सध्या या कार्डची जोरदार चर्चा सुरू आहे. याच कारण की या दोन स्लाईडच्या कार्डवर, ‘हम बारत के लोग, इन्कलाब जिंदाबाद असे स्लोगन लिहिलेले असून लोकांची रस्त्यावरील गर्दी, घरातील खिडकीतून बाहेर डोकावून पाहणारं एक नव दाम्पत्य, तसेच यावर शाहरूख खानच्या डीडीएलजे चित्रपटाचं पोस्टर देखील दिसत आहे. मांदरदेखील यामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्यामध्ये स्वराची लग्नाच्या वेळी केलेली पोस्ट देखील दिसत आहे.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

आता या वेडिंग कार्डचा अर्थ लावायचा झाला तर याच्या कॅप्शनमध्ये सांगितले की, आम्ही लोकांना पार्टीसाठी निमंत्रित करत आहोत. स्वराने तिच्या या कार्डमध्ये म्हटले आहे की, द्वेषाच्या या काळामध्ये आम्ही प्रेम मिळवले. सध्या चिंता, अनिश्चितता आणि भीतीच वातावरण आहे. पण तरी देखील आम्हाला आजूनही विश्वास आणि आपेक्षा आहेत. की सगळ ठीक होईल.’

या कार्डमधून सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. कारण फहाद अहमद हे समाजवादी पक्षाशी संबंधित असून ते समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेशी संबंधित आहेत. स्वरा भास्करदेखील वेळोवेळी राजकीय परिस्थितीवर आपली मतं मांडत असते. त्यामुळे त्यांच्या कार्डमध्ये देखील ते दिसून आले आहे.

Holi Festival 2023 : डॉल्बीचा दणदणाट आणि होळीचा जल्लोष… | LetsUpp Marathi

Tags

follow us