Download App

नाईट शिफ्ट, अपघात अन् शंभुराजची पहिली धडक! प्राजक्ताची फिल्मी लव्हस्टोरी…

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Love Story : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम ( Swarajyarakshak Sambhaji) अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आणि उद्योजक शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा काल 7 ऑगस्ट रोजी पार पडला. प्राजक्ता लव्ह मॅरेज करतेय की, अरेंज मॅरेज, हा प्रश्न चाहत्यांना पडतोय. खरं तर या दोघांचं लग्न लव्ह कम अरेंज (Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Love Story) आहे. एक अपघात…दोघांची पहिलीच भेट अन् शंभूराज प्राजक्ताच्या प्रेमाच पडले. ही घटना घडली, तेव्हा प्राजक्ता एका चित्रपटाच्या नाईट शिफ्टच्या शूटिंगला जात होती.

“एखादा क्षण आयुष्यभराची आठवण देतो हा तोच क्षण 😇Styled By @sheetal_suryawanshii Prajakta’s Sar (7)

जम्मू काश्मीरमध्ये चकमक! दोन जवान शहीद, पाच जण जखमी; एका अतिरेक्याचा खात्मा

त्यावेळी प्राजक्ताच्या (Prajakta Gaikwad Engagement) गाडीला एका दुसऱ्या गाडीने धडक दिली. त्यामुळे तिच्या गाडीचं बरंच नुकसान झाली, त्यामुळे प्राजक्ता समोरच्या ड्रायव्हरवर प्रचंड संतापली. तो ड्रायव्हर नशेत होता, त्यामुळे अर्वाच्य भाषेत प्राजक्ताशी बोलू लागला. हा सगळा गोंधळ पाहून शंभूराज गाडीतून खाली उतरले अन् त्यांनी ड्रायव्हरच्या दोन कानाखाली लगावल्या.

“एखादा क्षण आयुष्यभराची आठवण देतो हा तोच क्षण 😇Styled By @sheetal_suryawanshii Prajakta’s Sar (5)

मैत्री अन् भेटीगाठी वाढल्या…

आता गाडीचं नुकसान झालंय, शूटिंगला जाता येणार नाही, या काळजीत प्राजक्ता पडली. त्यामुळे शंभूराज यांनी स्वत: त्यांच्या गाडीतून प्राजक्ताला शूटिंगच्या ठिकाणी सोडली. अन् इथेच या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या, प्राजक्ता शंभूराज यांना दादा म्हणून हाक मारायची. परंतु शंभूराज प्राजक्ताच्या प्रेमात होते, त्यामुळे ते नेहमी मॅडम म्हणून हाक मारायचे.

आजच्या दिवस छत्री जवळ ठेवाच! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; अंदाज काय?

“एखादा क्षण आयुष्यभराची आठवण देतो हा तोच क्षण 😇Styled By @sheetal_suryawanshii Prajakta’s Sar (3)

सोशल मीडियावर सुद्धा अनेकदा पोस्ट केल्यानंतर वयाने छोट्या मोठ्या व्यक्ती प्राजक्ताला ताई म्हणायचे, पण शंभूराज यांनी ताई असं कधीच म्हटलं नाही. त्यानंतर शंभूराज यांनी प्राजक्ताला थेट लग्नाची मागणी घातली. परंतु प्राजक्ताने पहिल्यांदा नकार दिला. कारण खुटवड कुटुंब ही जॉईंट फॅमिली होती, तर प्राजक्ताचं कुटुंब छोटंसं. या मोठ्या कुटुंबात आपलं कसं होणार? हा प्रश्न प्राजक्ताला पडला होता. परंतु नंतर मात्र तिचं मत बदललं.

“एखादा क्षण आयुष्यभराची आठवण देतो हा तोच क्षण 😇Styled By @sheetal_suryawanshii Prajakta’s Sar (8)

प्रेमाचे सूर जुळले…

शिवायअभिनेत्री म्हणून हे क्षेत्र वेगळं… इथे नातं टिकवण्यासाठी एकमेकांमध्ये विश्वास पाहिजे. त्यासाठी शंभूराज प्राजक्तासोबत शूटिंगच्या ठिकाणी जाऊ लागले. त्यांनी प्राजक्ताच्या क्षेत्राची ओळख करून घेतली. दोघांत प्रेमाचे सूर जुळत गेले अन् पुढे प्राजक्ताच्या घरी लग्नासाठी विचार सुरू झाले. घरच्यांच्या संमतीशीवाय मी लग्न करणार नाही, अशी भूमिका प्राजक्ताने घेतली. मग काय? शंभूराज यांनी रीतसर प्राजक्ताच्या घरी लग्नाची मागणी घातली. अन् कालच त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला.

follow us