Swatantrya Veer Savarkar Teaser: स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सिनेमाचा लूक खूपच दमदार दिसून येत आहे. (Swatantra Veer Savarkar) यामध्ये तो अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोघांच्याही भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकबरोबर टीझर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social media) रिलीज करण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त हा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
रणदीप हुड्डा यांनी या सिनेमाचे पहिले पोस्टर आणि टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. टीझर व्हिडिओत रणदीप हुड्डा यांच्या आवाजात सिनेमाची कथा मांडण्यात आली आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेमध्ये रणदीप हुड्डा साखळदंडात वेढलेला दिसून येत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाच्या टीझरमध्ये रणदीप हुड्डा वीर सावरकरांच्या (Swatantra Veer Savarkar) भूमिकेत दिसला आहे.
'SWATANTRYA VEER SAVARKAR' TEASER OUT NOW… To mark the 140th birth anniversary of #VeerSavarkar, Team #SwatantryaVeerSavarkar – which stars #RandeepHooda in the title role – unveils its first teaser… #RandeepHooda makes his directorial debut with the biopic.… pic.twitter.com/3NWMrip1g5
— taran adarsh (@taran_adarsh) May 28, 2023
हा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सावरकरांना मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा, सेल्युलर जेलमध्ये त्यांचा झालेला छळ अशा अनेक गोष्टींची झलक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या टीझरमध्ये बघायला मिळाली आहे. तसेच टीझरमध्ये महात्मा गांधी यांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
टीझर शेअर करत असताना त्याने सांगितले आहे की, “भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक… इंग्रजांनाही सर्वात जास्त भीती वाटायची असं व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य आणि इतिहास जाणून घ्या… ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे”. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यामध्ये अभिनयाबरोबरच रणदीपनं या सिनेमाचं दिग्दर्शन देखील केले आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा रणदीपच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पण आता या टीझरमधील झलक पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. तसेच या सिनेमामधील संवादही उत्तम असणार याची झलक टीझरमध्ये बघायला मिळत आहे. भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आणि खुदीराम बोस यांसारख्या क्रांतिकारकांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग महाराष्ट्र, अंदमान निकोबार आणि लंडनध्ये झाले आहे. अभिनेता रणदीप हुड्डाचा हा दुसरा बायोपिक आहे. याअगोदर त्याने ‘सरबजीत’ हा बायोपिक केला होता.