Panjabi Song Camera Released: पंजाबी संगीताच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. पंजाबी गाण्यांच्या दुनियेत नवा ट्रेंड सेट करणारा गायक (Entertainment News) गिप्पी ग्रेवाल (Gippy Grewal) पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवं गाणं घेऊन आला आहे. टी-सीरिजने (T Series) सादर केलेलं त्याचं गाणं ‘कैमरा’ (Panjabi Song Camera) सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चर्चेत आलं आहे.
या गाण्याला चार्टबस्टर म्युझिक डुओ देसी क्रूने संगीत दिलं असून, दमदार बोल कप्तान यांनी लिहिले आहेत. उत्साही बीट्स आणि आकर्षक लिरिक्समुळे हा गाणा थेट डान्स फ्लोरवर आग लावणारा ठरणार आहे. या गाण्यात गिप्पी ग्रेवालच्या स्टाईलचा खास तडका पाहायला मिळतो. गाण्याची थीम एका ग्लॅमरस मुलीभोवती फिरते, ज्याचं सौंदर्य आणि स्टाइल जागतिक आयकॉन नोरा फतेहीशी जोडून दाखवलं आहे. त्यामुळे गाण्याला अतिरिक्त ग्लॅमर आणि युथ कनेक्ट मिळालं आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी
गाण्यात गिप्पी ग्रेवाल यांचा स्टाईल आणि त्यांचा खास अंदाज खुलून दिसतो. एका ग्लॅमरस गर्लचं वर्णन करताना त्याचा ग्लोबल आयकॉन नोरा फतेहीशी अप्रत्यक्ष संदर्भ जोडला गेला आहे, ज्यामुळे गाण्यात आणखी स्टाइलिश टच आला आहे.खास करून क्लब्स, पार्ट्या आणि फेस्टिव्हल सीझनमध्ये हा गाणा धमाल उडवणार, असा अंदाज व्यक्त केला जातो.
ब्रेकिंग! सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित, पूरामुळे निवडणुकीची रणधुमाळी थांबली
हाय-एनर्जी डिस्को बीट्स, गिप्पी ग्रेवालचे बेमिसाल मूव्हज आणि रंगीबेरंगी लोकेशन्समध्ये शूट केलेलं आकर्षक व्हिडिओ यामुळे हा गाणा संगीतप्रेमींना खिळवून ठेवतो. कैमरा’ हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नाही तर पाहण्यासाठीही तेवढंच आकर्षक ठरतंय.
गाण्याचं मिक्स आणि मास्टरिंग डेंस यांनी केलं आहे. स्वॅग, एनर्जी आणि पंजाबी तडका यांचा उत्तम संगम असलेला ‘कैमरा’ आता टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर आणि इतर सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.