ब्रेकिंग! सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित, पूरामुळे निवडणुकीची रणधुमाळी थांबली

Maharashtra cooperative societies Elections Postponed : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन् त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Flood) पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात (Maharashtra cooperative societies Elections) आल्या आहेत.
पावसामुळे भीषण परिस्थिती
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून, नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. अशा गंभीर परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन सहकार विभागाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
तरुणांनो तयारीला लागा! पोलीस भरतीचा GR आला; 15,631 पदांसाठी मेगाभरती
सहकारी संस्थांच्या निवडणुका ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो मतदारांशी संबंधित असल्यामुळे पूरस्थिती स्थिर झाल्यानंतरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या निवडणुका सप्टेंबरअखेरपर्यंत पुढे ढकलल्या जाणार आहेत.
पुढची प्रक्रिया काय?
आता पावसाची तीव्रता कमी होऊन परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर केला जाईल. सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार विभागाने सांगितले की, मतदारांना कोणतीही अडचण नको म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. पावसाचे संकट टळल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली जाईल.
शेतकरी आणि नागरिकांत नाराजी
निवडणुका पुढे ढकलल्याने काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांत नाराजी आहे. कारण त्यांनी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. मात्र पावसाचे संकट पाहता बहुतांश लोकांनी हा निर्णय योग्य असल्याचे मान्य केले आहे.