T series कडून नवं भक्तिगीत रिलीज; ‘इक्का म्हणतो ‘लाडला’ भगत भोलेनाथ का’

T series : टी सिरीजचं (T series) कोणतंही गाणं आलं की, प्रेक्षक अगदी आतुर असतात. असंच एक नव भक्तीगीत टी सिरीजकडून रिलीज करण्यात आलं आहे. मात्र हे भक्ती गीत रॅप या फॉरमॅटमध्ये असणार आहे. भूषण कुमार यांनी निर्मिती केलेलं ‘लाडला’ हे गाणं रॅपर इक्काच्या ओन्ली लव गेट्स रिप्लाय या अल्बम मधील दुसरं गाणं आहे. Government […]

T series कडून नवं भक्तिगीत रिलीज; 'इक्का म्हणतो 'लाडला' भगत भोलेनाथ का'

T Series

T series : टी सिरीजचं (T series) कोणतंही गाणं आलं की, प्रेक्षक अगदी आतुर असतात. असंच एक नव भक्तीगीत टी सिरीजकडून रिलीज करण्यात आलं आहे. मात्र हे भक्ती गीत रॅप या फॉरमॅटमध्ये असणार आहे. भूषण कुमार यांनी निर्मिती केलेलं ‘लाडला’ हे गाणं रॅपर इक्काच्या ओन्ली लव गेट्स रिप्लाय या अल्बम मधील दुसरं गाणं आहे.

Government Schemes : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचा लाभ कोण अन् कसा घेऊ शकते?

हे गाणं स्वतः इक्काने गायले आणि लिहिलं आहे. तर या गाण्याला संजय यांनी संगीत दिला आहे. या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन अगन आणि अजीम यांच्याकडून करण्यात आलं आहे. तसेच यामध्ये मोनिका शर्मा देखील इक्कासोबत दिसत आहे. यामध्ये पाश्चिमात्य पद्धतीने अत्याधुनिक दृश्यांच्या आणि मॉडर्न कंटेम्परी आणि ऍसिटिक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.

या गाण्याबद्दल बोलताना रॅपर इक्का म्हणाला की, हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. या गाण्यातून मी महादेव म्हणजेच भोलेनाथांच्या बद्दलची माझी भक्ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी असं गाणं बनवायची इच्छा होती जे रॅप आणि हीपहॉप यांच्यापेक्षा वेगळं असून त्यामध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळेल.

सेटलमेंट न झाल्याने अदानींविरोधात मोर्चा काढला का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तिखट सवाल

हे गाणं टी सिरीजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तर अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. काही तासातच या गाण्याला मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाले होते.

Exit mobile version