MC Stan: ‘उर्वशी’साठी रॅप सेन्सेशन इक्का अन् एमसी स्टॅन दिसणार एकत्र

MC Stan: ‘उर्वशी’साठी रॅप सेन्सेशन इक्का अन् एमसी स्टॅन दिसणार एकत्र

MC Stan New Rap: ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅनच्या (MC Stan) लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने ‘इंडिया टूर’चं आयोजन केलं आहे. त्याअंतर्गत तो देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या रॅप शोचं आयोजन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)


इक्का (Ikka )आणि एमसी स्टॅन, टी-सीरीजच्या सर्वात मोठ्या म्युझिक लेबलसह एक नवीन ट्रॅक घेऊन येणार आहेत. ”उर्वशी’ जो तुम्हाला नक्कीच डान्स, रॅप आणि पार्टी करायला लावणार आहे. ही जोडी त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाते, आणि त्यांची जोडी लोकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी ठरणार आहे.

तसेच ‘उर्वशी’ आपल्या शक्तिशाली संगीताने प्रेक्षकांची माने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. इक्का आणि एमसी स्टॅनचे स्थान रॅप आणि हिप-हॉप सीनमधील प्रमुख खेळाडू म्हणून चिन्हांकित करते. गाण्याचे इतर सर्व तपशील गुंफलेले असले तरी, हे निश्चितपणे एक आश्चर्यकारक सहकार्यासारखे वाटणार आहे.

Karachi To Noida Teaser: सीमा हैदरच्या लव्हस्टोरीवर आधारित ‘कराची टू नोएडा’ सिनेमाचा टीझर रिलीज

बिग बॉस 16’मध्ये एमसी स्टॅनने भांडणापेक्षा आपल्या हटके स्टाइलने सर्वांना वेड लावलं होतं. एका कार्यक्रमाचं एमसी स्टॅन 20 ते 25 लाख मानधन घेतो. 23 वर्षीय रॅपरची एकूण संपत्ती 16 कोटींच्या घरात आहे. ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये रक्कम देण्यात आली. तसेच हुंडई ग्रॅन्ड आय 10 निओस ही गाडीदेखील भेट देण्यात आली होती.

‘बिग बॉस 16’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. नुकतच त्याने एक इन्स्टा लाइव्ह केलं असून या लाइव्हला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जगभरातील टॉप 10 लाइव्हमध्ये या लाइव्हचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्याने आता अरिजित सिंह, एआर रहमान आणि नेहा कक्कर या गूगल ट्रेंडमध्ये असणाऱ्या सेलिब्रिटींनादेखील मागे टाकलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube