Download App

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढत असताना भाजपचे लोक…संजय राऊतांचा घणाघात

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on MNS Alliance : महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत. ते म्हणजे, शिवसेना उद्धव ठाके आणि मनसे राज ठाकरे असं म्हणत युतीच्या दिशेने आम्ही सकारात्मक असल्याचं पुन्हा एकदा राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. (MNS) शिवसेनेची मानसिकता आणि भूमिका स्पष्ट आहे. मराठी माणसाची एकजूटता व्हावी असं उद्धव ठाकरे यांना वाटते असं ते म्हणाले. या एकजुटतेसाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत त्यांनी दिले. ते माध्यमांशी बोलत होते.

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे, असं वक्तव्य केलं होते. त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला. शाहांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखं आहे. शिंदे गट हा अमित शाहांच्या मालकीचा आहे. अमित शाहांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना नैराश्य आल्याचा दावा राऊतांनी केला.

बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय?, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर थेट वार

बोलबच्चन डायलॉगवरून राऊतांनी जोरदार फटके बाजी केली. बोलबच्चनगिरीची ही प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळाल्याचा चिमटा त्यांनी काढला. आम्ही सुद्धा काही वर्षे त्यांच्यासोबत युतीत होतो. त्यामुळे तो गुण लागला असावा असा टोला त्यांनी लगावला. तर मोदी हे जागतिक बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा शेरा मारला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाची युतीवरही भाष्य केलं. महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेससोबत आम्ही २०१९ गेलो. कारण ती राज्याची गरज होती. परंतु, इतिहास पाहिला तर, भाजपचे त्यावेळचे लोक इंग्रजांचे खबरे म्हणून काम करत असताना काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम करत होती असा थेट घणागात राऊत यांनी यावेळी केला आहे. तसंच, काँग्रेसचे आणि आमचे कितीही मतभेद असले तरी त्यांनी या देशाला स्वातंत्र्या मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला हे कुणीही नाकारू शकत नाही असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

follow us