Video : मुंबई तुंबली अन् आनंद दिघे स्वप्नात आले; एकनाथ कुठंय?, राऊतांकडून शहांवरही प्रहार

Video : मुंबई तुंबली अन् आनंद दिघे स्वप्नात आले; एकनाथ कुठंय?, राऊतांकडून शहांवरही प्रहार

Sanjay Raut on BJP : गेल्या दोन दिवसांत मुंबईत जोरदार पाऊस झाला. (Raut) रात्रभर पावसाचा मारा सुरूच होता. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे रुग्णालयासह रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. यावर आता संजय राऊत यांनी आज (दि.२७) रोजी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केलाय.

मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कुणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कुणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडालं एकनाथ कुठंय? एकनाथ शिंदे अमित शाहांचं लांगुणचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठंय तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुणचालनात व्यस्त आहे असा थेट घणाघात केलाय.

शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणी अन् का फोडली; संजय राऊतांचा थेट वार, नक्की काय म्हणाले?

आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना पश्चाताप झाला असता. तसंच, अमित शाहांनी आम्हाला सांगू नये. हे शेअर बाजारातील दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भाजप व्यापारांचा पक्ष आहे. हा शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू नये असा थेट वार राऊतांनी केला.

मेट्रोच्या घोटाळ्यात सत्ताधाऱ्यांना दीड हजार कोटींची दलाली मिळाली आहे. मुंबईतील कामांमध्ये 35 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा भाजपा आणि शिंदे गटानं केलेला आहे आणि त्या पैशांतून पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना विकत घेतलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. केला. तसंच, फक्त श्रेय घेण्यासाठी मेट्रोच उद्घाटन केलं असही राऊत म्हणालेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube