Teachers Day : अभिनेता अर्जुन रामपालने शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) एक भावूक पोस्ट केली आहे. यावेळी त्याने शिक्षक दिनानिमित्त त्याच्या शिक्षिकेला आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर ही भावूक पोस्ट केली आहे. अर्जुन त्याच्या अभिनयाने ज्याप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकत असतो त्याचप्रमाणे त्याने या पोस्टद्वारे देखील चाहत्यांचे मनं जिंकले आहेत.
राम शिंदे-रोहित पवार एका एमआयडीसीसाठी भांडतायत; विखेंनी एकाच वेळी दोन मंजूर करून मारली बाजी
काय म्हणाला अर्जुन रामपाल?
अभिनेता अर्जुन रामपालने शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) एक भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने त्याची दिवंगत आई आणि गुरूला श्रद्धांजली वाहिली. त्यात त्याने त्याच्या आईच्या म्हणजेच जी त्याची शिक्षिका देखील होती. तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात त्याच्या दमदार अभिनयानंतर आता त्याची ही भावनीक बाजू देखील अनुभवायला मिळाली आहे.
अर्जुनची आई ग्वेन रामपाल या इंग्रजी लिटरेचर आणि इतिहासाच्या प्रध्यापिका होत्या. मात्र आता त्यांचे निधन झालेले आहे. त्यामुळेअर्जुन रामपाल दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत असतो. सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट करत असतो. या पोस्टमध्ये देखील अर्जुनने आपल्या आईबद्दल खास भावना व्यक्त केल्या आहेत. कारण आपली पहिली गुरू ही आपली आई असते.
“हा लढा एका दिवसाचा नसतो… तब्येतीची काळजी घ्या” : आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमळ सल्ला
माझी शिक्षिका (Teachers Day) स्वर्गामध्ये राहते. जी वेळो-वेळी माझ्याशी हळूहळू बोलते. ती मला आम्ही सोबत असतानाच्या दिवसांची आठवण करून देते. तेव्हा तिने मला ज्ञानही दिलं आहे. तीने जे काही मिळवलं त्याचा अभिमान बाळलगा. मात्र नम्र देखील राहीली. तसेच तिच्या विश्वासांवर ठाम राहाली. ज्यांच्या सोबत असायची त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायची. ती खूप विचारी, दयाळू आणि प्रेमळ होती. तुझे ते गुण कधीही संपू नये. कुणाचीही तुलना स्वतः शी करू नये. प्रत्येक जण वेळेनुसार बदलत असतो. पुढे जात असतो. तु माझा मुलगा आहेस. विद्यार्थी आहेस. माझा गौरव आहेस. असं ती म्हणायची मी आता तिच्या या विचारांच्या माध्यामातून जगत आहे. आई. तसेच अर्जुनने यामध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा फोटो देखील पोस्ट केला आहे. असं म्हणत त्याने ही भावूक पोस्ट केली आहे.