“हा लढा एका दिवसाचा नसतो… तब्येतीची काळजी घ्या” : आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमळ सल्ला
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा प्रेमळ सल्ला वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला. (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar supported the Maratha reservation demand)
प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. आज (5 सप्टेंबर) त्यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली.
काय म्हणाले प्रकाश आंबडेकर?
हा लढा पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहतो. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा ते म्हणत होते की स्वातंत्र्य मिळणार नाही. पण चर्चिल हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ. मी मानतो की एक नवीन वाटचाल आपल्याला करावी लागले. या शासनातील मंडळीला इथल्या व्यवस्थेला आणि कोर्टाला अंगावर घ्यायला मानसिकदृष्ट्या तयार करायला केले पाहिजे. त्या दिवशी तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही.
घटनेत असे कुठेही नमूद केलेले नाही की एखाद्या समाजाला काही देता येणार नाही. पण देत असताना त्या वर्गाला खरंच गरज आहे का हे शासनाने सिद्ध केले पाहिजे. पण शासनाची उदासिनतेमुळे हा प्रश्न अडकला आहे. मात्र कोणावर टीका करुन हा प्रश्न सुटणार नाही, विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्यांना या प्रश्नाची जाणीव आहे, तो सोडवला गेला पाहिजे असं वाटतं ते लोकं सभागृहात जात नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. कारण शासन निर्णय घेते, पण या निर्णय प्रक्रियेतच उदासिन लोकं असलतील तर हा प्रश्न सुटणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.