The first cinematic universe in Marathi, ‘Ghabadkund’, brings a new experience of thrill and mystery : मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य थराराची पातळी उंचावत नेतं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रत्येकाला एक मोठं ‘सरप्राईज’ देईल, असा विश्वास निर्माते डॉ. रसिक कदम यांनी व्यक्त केला आहे.
‘सखा माझा पांडुरंग’मध्ये 8 वर्षांची लीप; ही अभिनेत्री साकारणार मोठ्या झालेल्या संत सखुबाई
‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ प्रस्तुत मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला ‘घबाडकुंड’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
अमेरिका रशियन तेलावरील सवलत संपणार; ट्रम्पच्या आदेशानंतर भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?
रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात; मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! ‘घबाडकुंड’ मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटनांनी सजलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.
क्रिकेटच्या इतिहासात नवीन विक्रम; अवघ्या पाच चेंडूत ‘या’ संघाने मारली बाजी
रहस्य, भय, थरार आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे. ‘घबाडकुंड’मधील रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. १९ जूनपासून हा अनोखा सिनेमॅटिक प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात यावे,’ असे आवाहन कलाकारांनी केले.
