Download App

Box Office: ‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

The Kerala Story Box Office Collection day 1: ‘The Kerala Story’ हा सिनेमा काल ५ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच मोठा वाद सुरू झाला होता. (The Kerala Story Box Office Collection day 1) यामुळे या सिनेमाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या सिनेमातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, (Box Office Collection) असं म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

हा सर्व प्रकार सिनेमापूर्वीच सुरु झाला तरी देखील हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ला पहिल्याच दिवशी चाहत्यांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहते या सिनेमाचे जोरदार कौतुक करत आहेत. अशातच सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.५ कोटींचा गल्ला कमावला आहे. ही अंदाजे आकडेवारी आहे. यामुळे अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडा बदल होऊ शकणार आहे. तर दुसरीकडे काही विश्लेषकांच्या मते, सिनेमाच्या वीकेंडमध्ये चांगले कलेक्शन करू शकणार आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

दरम्यान या सिनेमाला बराच मोठा विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका देखील कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यावेळी केरळमधील ३२ हजारहून जास्त महिलांना ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा सिनेमाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काढून टाकला जाणार असल्याचे आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिले आहे.

Tags

follow us