Download App

The Night Manager 2 Trailer: ‘हिसाब अभी बाकी है..’, ‘द नाईट मॅनेजर 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

The Night Manager 2 Trailer : ‘द नाईट मॅनेजर’ या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Manager 2) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (The Night Manager Part 2 Trailer) या ट्रेलरने चाहत्यांना सीरिजबद्दलची (series) मोठी उत्सुकता लागली आहे.


‘द नाईट मॅनेजर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. ‘द नाईट मॅनेजर 2’ ही सीरिज चाहते येत्या 30 जूनपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) बघू शकणार आहेत. यामध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपालासह तिलोत्तमा शोम, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी हे कलाकार देखील या सीरिजमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहेत.

रावणाची लंका जाळण्यासाठी आग तर लावावी लागते, असे डायलॉग ‘द नाईट मॅनेजर 2’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. यामुळे आता या सीरिजमध्ये शॉन शैलीची लंका जाळत असल्याचे दिसून येणार आहे. थरार नाट्य असणाऱ्या ‘द नाईट मॅनेजर 2’ या सीरिजमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द नाईट मॅनेजर 2’ (The Night Manager 2) या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियांका घोष आणि संदीप मोदी यांनी सांभाळली आहे.

जॉन ले कॅरी (John Le Carre) यांनी लिहिलेल्या ब्रिटिश सिरीयल ‘द नाईट मॅनेजर’वर बेतलेली ही सिरीयल आहे. या बहुचर्चित सीरिजचा ट्रेलर चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरला आहे. ‘द नाईट मॅनेजर’चा पहिला सीझन संपल्यावर दुसऱ्या सीझनमध्ये काय होणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. ‘द नाईट मॅनेजर 2’च्या ट्रेलरमधील अनिल कपूरच्या हँडसम लूकची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन जास्त नाट्यमय, क्रूर आणि उत्साहवर्धक दिसून येणार आहे. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये अनिल आणि आदित्य रॉय कपूर ही सुपरहिट जोडी दिसून येणार आहे. अनिल कपूरचे ‘अॅनिमल’ आणि ‘फायटर’ हे सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. अनिल कपूरने ‘द नाईट मॅनेजर 2’चा ट्रेलर शेअर करत लिहिले आहे,”शैलीची लंका जाळण्यासाठी शान तयार आहे. बहुचर्चित वेबसीरिजचा शेवट लवकरच समोर येणार असल्याची मोठी चर्चा आहे.

Tags

follow us