Download App

Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’च्या पोस्टरचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण

Musafira Movie Poster Ceremony: ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा. (Musafira Movie) खरंतर सिनेमाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र जोरदार चर्चा होती. (Marathi Movie) एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे सिनेमाची तगडी स्टारकास्ट. (Musafira Movie Poster) यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’ च्या प्रदर्शनाची डेट जाहीर करण्यात आली आहे.


यावेळी ढोल ताशाच्या गजरात ‘मुसाफिरा’च्या 20 फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले आहे. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा मराठी सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या बिग बजेट सिनेमात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

‘मैत्री’ हा विषय कायम प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत असतात. ‘मुसाफिरा’ ही असाच मैत्रीवर बेतलेला सिनेमा आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.

सिनेमाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात की, ” स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय सिनेमाचा मान ‘मुसाफिरा’ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा सिनेमा केवळ तरुण पिढीसाठी मर्यादित नसून हा सिनेमा प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा मराठी सिनेमा जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे.

सारा तेंडुलकरच्या नावाने फेक अकाऊंट, असलीपेक्षा 1 लाख जास्त फॉलोअर्स

आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीमध्ये पदार्पण करत आहे. ‘मुसाफिरा’ चाहत्यांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की !”

Tags

follow us