Download App

The Sabarmati Report साठी नेटिझन्सकडून राशी खन्नावर कौतुकाचा वर्षाव

The Sabarmati Report : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messy ) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report )चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यापासून नेटिझन्स राशीचे स्क्रिप्टच्या निवडीबद्दल कौतुक करत आहेत. यामी गौतम, मृणाल ठाकूर इत्यादी अभिनेत्रींच्या लीगमध्ये राशी कशी सामील होते हे तिच्या चाहत्यांनी नमूद केले आहे.

Dunk साठी तुषार कपूर सज्ज; पहिल्यांदाच सकारणार आगळी-वेगळी भूमिका

राशीला तिच्या चाहत्यांकडून दाद मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने अनेकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ” योद्धा ” मध्ये दिसली होती आणि तिने प्रियमवदा कात्याल या सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेने सगळ्यांची मन जिंकली. योध्दा नंतर ‘द साबरमती रिपोर्ट ‘ हा तिचा दुसरा थिएटरमध्ये रिलीज होणारा चित्रपट आहे.

विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

पहिल्याच फ्रेमपासून विक्रांत आणि राशी पत्रकार म्हणून त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडतात. 2002 च्या ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर काय घडले ते या चित्रपटात उलगडत असताना टीझरच्या व्हिज्युअलमध्ये कमालीची जादू आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा असणार आहे.

‘…तर तुतारीची पिपाणी’! शिवतारेंबद्दलच्या व्हायरल पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर

रंजन चंदेल दिग्दर्शित या चित्रपटात ती एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या दुःखद घटनेभोवती फिरतो. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

follow us