Download App

The Sabarmati Report चा टीझर आऊट! विक्रांत मॅसी अन् राशी खन्नाची जोडी मोठ्या पडद्यावर

The Sabarmati Report : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशि खन्ना आणि विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा ( The Sabarmati Report ) टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच फ्रेमपासून विक्रांत आणि राशी पत्रकार म्हणून त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडतात. 2002 च्या ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर काय घडले ते या चित्रपटात उलगडत असताना टीझरच्या व्हिज्युअलमध्ये कमालीची जादू आहे.

CM शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर; खासदार तुमानेंचा पत्ता कट, कोल्हापुरात पुन्हा मंडलिकच

निर्मात्यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर केला असून त्यात लिहिले आहे, “देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना घडली.” रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा असणार आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित या चित्रपटात राशी पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ” योद्धा ” मधून तिने उत्तम अभिनय केला आहे.

सहाशेहून अधिक वकिलांचा लेटर बॉम्ब; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आता थेट काँग्रेसवर हल्ला !

असीम अरोरा, अर्जुन भांडेगावकर आणि अविनाश सिंग तोमर लिखित, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये रिद्धी डोगरा यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी रिलीज होणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ व्यतिरिक्त, राशी हिंदीतील ‘टीएमई’मध्ये दिसणार आहे, तर तिच्याकडे तमिळ आणि तेलुगूमध्ये ‘अरनमानाई 4’ हा ‘तेलुसू कडा’ चित्रपट आहेत.

follow us

वेब स्टोरीज