The Sabarmati Report: ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; राशी खन्नाने शेअर केला अनुभव…

The Sabarmati Report: ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; राशी खन्नाने शेअर केला अनुभव…

Raashi Khanna The Sabarmati Report: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) सक्रिय असलेली राशी खन्ना (Rashi Khanna) ही साऊथ चित्रपटसृष्टीतील (South Film Industry) फारच प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुपरहिट साऊथ सिनेमे केले आहेत. त्यांनतर राशीने जॉन अब्राहमसोबत ‘मद्रास कॅफे’मधून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं होतं. राशीने अलीकडेच अनेक बॉलिवूड चित्रपट साइन केले आहेत.

आता पॅन इंडियाची युवा स्टार राशि खन्ना हिने तिच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. राशी खन्नाने चित्रपटाच्या सेटवरील काही BTS शेअर फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी राशी खूपच उत्सुक झाल्याचे दिसत आहे.

‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा असणार आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित या चित्रपटात राशी पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ” योद्धा ” मधून तिने उत्तम अभिनय केला आहे.

बॉक्स ऑफिसवर नाही चालली रणदीपच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ची जादू, जाणून घ्या किती केली कमाई

असीम अरोरा, अर्जुन भांडेगावकर आणि अविनाश सिंग तोमर लिखित, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये रिद्धी डोगरा यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी रिलीज होणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ व्यतिरिक्त, राशी हिंदीतील ‘टीएमई’मध्ये दिसणार आहे, तर तिच्याकडे तमिळ आणि तेलुगूमध्ये ‘अरनमानाई 4’ हा ‘तेलुसू कडा’ चित्रपट आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube