Download App

TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी पहिली पसंती दिली आहे. या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. मात्र गेल्या काही काळापासून या शोबाबत बरेच वाद निर्माण झाले आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी शो सोडला असून निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले आहेत. शोची लीड अॅक्ट्रेस दिशा वकानी (Disha Vakani ) म्हणजेच दयाबेनही (Dayaben) गेल्या अनेक महिन्यांपासून शो सोडला आहे. दरम्यान, निर्मात्यांनी दयाबेनचे पुनरागमन होत असल्याची माहिती दिली.


दयाबेनच्या पुनरागमनाच्या बातमीने चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दयाबेनच्या पुनरागमनाचे चर्चा शोच्या अनेक एपिसोडमध्ये मध्ये देखील रंगत होते. अनेक एपिसोडमध्ये दयाबेनच्या स्वागताच्या तयारीची झलकही पाहायला मिळाली. पण आता शोच्या नवीन प्रोमोमध्ये दयाबेन काही कारणास्तव येऊ शकल्या नसल्याचे दाखवण्यात आले आहे.

प्रोमोमध्ये दाखवले आहे. दयाबेनच्या गैरहजेरीमुळे गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येकाला राग येतो. मात्र निर्मात्यांची ही कृती पाहून चाहते आणि प्रेक्षकही संतापले आहेत. एका यूजरने लिहिले की – असित कुमार मोदी, तुमच्या प्रेक्षकांचे मन मोडल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल आणि आता नवीन एपिसोड पाहण्याचे कारण नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते आम्हाला समजते. लाज वाटली पाहिजे. हॅशटॅग बॉयकॉट TMKOC

‘हृदयविकाराचा झटका नाही तर…’, CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला…

आणखी एका युजरने लिहिले आहे की, चाहत्यांची मनं तोडून तुम्ही आनंदी आहात. आता नाही… #boycottTMKOC थांबवा. आणखी एका चाहत्याने लिहिले – दया आणि जेठा… तारक मेहतावर बहिष्कार टाका… मला काहीही लिहावेसे वाटत नाही, तुम्ही सर्व चाहत्यांचे हृदय तोडले आहेत.

Tags

follow us