Dayaben: नवरात्रीत दयाबेनच्या लूकनं वेधलं लक्ष; पहिल्यांदाच पती अन् मुलासोबतचा व्हिडिओ व्हायरल
Disha Vakani Video : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या सिरियलमधील दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी (Dayaben) प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. दिशाने बाळंतपणासाठी सिरियलमधून मोठा ब्रेक घेतला होता. (Video viral) परंतु ती पुन्हा सेटवर आलीच नाही. (Social media) गेल्या ६ वर्षांपासून सिरियलचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या नवरात्रीच्याच एका कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी ती पती आणि मुलासोबत आल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram
तसेच प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये ती तिच्या पती आणि मुलासोबत दिसून आल्याचे बघायला मिळत आहे. नवरात्रीमध्ये दिशा सध्या पारंपरिक गुजराती वेशभूषेमध्ये बघायला मिळाली आहे. दिशाने पती मयूर पडिया आणि मुलासोबत 16 ऑक्टोबर दिवशी नवरात्रीच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी तिने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. तर तिच्या पतीने गुलाबी रंगाची शेरवानी घातल्याचे दिसत आहे.
तसेच दिशाच्या पतीने त्यांच्या मुलाला उचलून घेतलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदा दिशा पती आणि मुलासोबत पापाराझींसमोर आल्याचे दिसत आहे. दिशाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सिरीयल 2017 मध्ये सोडली आहे. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा सिरीयलमध्ये आलीच नाही. तिला सीरियलमध्ये परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले होते. परंतु दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिशाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत होता.
ठरलं! ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’; बहुप्रतीक्षित ‘खुर्ची’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला
या व्हिडीओत दिशा तिचा पती मयूर आणि दोन मुलांसोबत चाहत्यांना बघायला मिळाली होती. एका मंदिरामध्ये संपूर्ण कुटुंबीयांसोबत बसून ती पूजा करत असल्याचा व्हिडिओ जोरदार चर्चेचा विषय बनला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सिरीयल गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचा कायम मनोरंजन करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या सीरियलमध्ये झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचे बघायला मिळत. आतापर्यंत यामध्ये अनेक कलाकारांनी या सीरियाला रामराम ठोकला आहे.