‘हृदयविकाराचा झटका नाही तर…’, CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला…

‘हृदयविकाराचा झटका नाही तर…’, CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला…

Dinesh Phadnis: छोट्या पडद्यावरील सीआयडी (CID) या प्रसिद्ध शोमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवलेले अभिनेते दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर (Social media) जोरदार रंगत होती. मात्र आता सीआयडीमधील दया ही भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) यांनी दिनेश यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. दयानंद यांनी दिनेश यांना हार्ट अटॅक आल्याचे माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)


मिळालेल्या माहितीनुसार दिनेश यांची हेल्थ अपडेट देत असताना दयानंद शेट्टी म्हणाले की, ‘दिनेश फडनिस यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्यांचे निरीक्षण करत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, त्याच्यावर एका वेगळ्या कारणांमुळे उपचार सुरू आहेत, अशी माहिती अभिनेत्याने यावेळी दिली आहे.

दिनेश फडनिस यांच्यावर तुंगा या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिनेश यांची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. त्यांना भेटण्यासाठी सीआयडी (CID) शोमधील सर्व कलाकार देखील हॉस्पिटलमध्ये गेले होते. दिनेश यांनी सीआयडी या लोकप्रिय शोमध्ये त्याने इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सची मुख्य भूमिका साकारली होती. या शोमधील त्यांच्या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. त्याने या शोमध्ये अनेक वर्षे काम केले आहेत. दिनेश यांची कॉमेडी चाहत्यांना नेहमीच आवडली होती. या शोमध्ये दयानंद शेट्टीने इन्स्पेक्टर दया ही भूमिका साकारली होती.

सीआयडीमधील फ्रेडी भूमिका साकारणारे दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका, व्हेंटिलेटवर उपचार सुरू

सीआयडीच्या या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दिनेश तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये देखील मनोरंजन करताना बघायला मिळाला होता. या शोमध्ये एक छोटी भूमिका त्यांनी साकारली होती. त्याने आमिर खानच्या सिनेमात देखील काम केले आहे. सरफरोश या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. दिनेश यांनी ‘भरला हा मालवत रक्त’ या मराठी सिनेमात देखील काम केले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube