‘TMKOC’चे कलाकार मालिका का सोडतायेत? असित मोदींवर मोनिकाचा आरोप

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सिरीयल गेल्या 14 वर्षे झाले चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करते आहे. परंतु या सीरियलमध्ये सध्या कलाकार आणि निर्मात्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सिरीयलतील अभिनेत्री या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा (TMKOC Controversy) आरोप करत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे या सिरीयलतील वातावरण पुन्हा एकदा चिघळू लागले आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 24T155315.971

TMKOC

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सिरीयल गेल्या 14 वर्षे झाले चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करते आहे. परंतु या सीरियलमध्ये सध्या कलाकार आणि निर्मात्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सिरीयलतील अभिनेत्री या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा (TMKOC Controversy) आरोप करत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे या सिरीयलतील वातावरण पुन्हा एकदा चिघळू लागले आहे.


सिरियलमधील लोकप्रिय कलाकार ही सिरीयल सोडून गेले होते. या सिरियलमधील मुख्य भुमिकेमध्ये असणाऱ्या दयाबेन ही देखील अनेक वर्षांपासून सिरियलमधून गायब आहेत. यातून सिरियलमधील टप्पूही ही सिरियल सोडून गेला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या सिरियलची लोकप्रियता अफाट असली, तरी मात्र या सिरियलभोवती वादांची मालिका ही सुरूच आहे.


यातून आता या सिरियलमधील बबिताजी (Babitaji From TMKOC) हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता यांच्याबरोबर देखील निर्मात्यांकडून ट्रोर्चर झाल्याचे गंभीर आरोप या सिरियलमधील अभिनेत्री मोनिका भदौरिया (Monika Bhadoriya) यांनी केले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी या मालिकेत बावरीची भुमिका करणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिनं या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर लैगिंक छळाचे आरोप करण्यात आले होते.

आता यावेळी मोनिका यांनी सांगितले आहे की, बबिताजीची भुमिका करणाऱ्या मुनमुन दत्ता (Munmun Dutta)या देखील हा शो करत असल्या तरी त्यांनाही असित मोदीने खूप टॉर्चर करत असल्याचे आरोप लावले आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये मोनिका यांनी सांगितले की, ‘मुनमुन यांनी शो सोडला नाही, परंतु सेटवर त्यांचा देखील छळ होत होता. त्यासाठी त्या बऱ्याच काळासाठी शूटिंगला येत नव्हत्या. असित मोदी सेटवर सगळ्यांनाच फार त्रास देत असतात, आणि त्यामुळे लोकं शो सोडून जात आहेत. त्यानंतर त्यांना परत बोलावले जाते. मुनमुनसुद्धा खूप वेळा शो सोडून गेली आहे. परंतु त्यांना परत बोलावले जात असायचे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

असित मोदींवर आरोप
गेल्या काही दिवसाअगोदर मोनिका भदौरिया यांनी स्वत:हून शो सोडला होता, आणि असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. 2019 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. या वर्षी त्यांना 3 महिन्यांचे पैसेही मिळाले नव्हते. मोनिका यांच्या आईचे निधन झाले होते, तेव्हा त्यांना एका आठवड्यामध्येच सेटवर परत बोलवण्यात आले होते.

त्यातून त्यांना असंही सांगण्यात आले होते की, तुला आम्ही पैसे देत आहोत, तेव्हा आम्ही तुला कधी देखील बोलवून घेऊ शकतो. सोबतच अभिनेत्री प्रिया अहूजा यांनी देखील निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांना 9 महिने शोमध्ये बोलवले नव्हते. निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्यावर पैसे देखील थकवल्याबद्दल आरोप करण्यात येत आहेत.

Exit mobile version