पंकज त्रिपाठींच्या उपस्थितीत रंगला ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग

Ek Tichi Goshta च्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

Ek Tichi Goshta

Ek Tichi Goshta

Twenty Fifth performance of ‘Ek Tichi Goshta’ took place in presence of Pankaj Tripathi : मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अनोख्या नृत्यनाट्याची दखल आता बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही घेतली गेली आहे. निमित्त आहे ‘एक तिची गोष्ट’च्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाचे! या खास प्रयोगाला हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. नृत्य, अभिनय आणि भावनांचा सुंदर मिलाफ असलेल्या या नृत्यनाट्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रयोगाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत ‘अद्भुत’ अशी विशेष दाद दिली. हिंदी सिनेसृष्टीतील अशा प्रतिभावान कलाकाराकडून मिळालेली ही शाबासकी म्हणजे ‘एक तिची गोष्ट’च्या संपूर्ण टीमसाठी मोलाची पावतीच!

जितेंद्र कुमार-प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका, सायकोलॉजिकल थ्रिलर “डाळिंब” ‘या’ प्रदर्शित होणार!

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मीतीने साकारलेल्या ‘एक तिची गोष्ट’ने यशस्वी २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. विराजस कुलकर्णी लिखित या नृत्यनाट्याचे दिग्दर्शन सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी केले आहे. गौरी कालेलकर-चौधरी, सिद्धेश चौधरी आणि फुलवा खामकर यांची निर्मिती असलेल्या या नृत्यनाट्यात प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची कन्या आस्मा खामकर,ओमकार गोखले यांच्या कलाविष्काराचा कलानुभव रसिकांना अनुभवायला मिळतो.

7 दशकांची परंपरा मोडली! एका मुलाची आई बनली ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे नियम नेमके काय बदलले?

हे नाटक म्हणजे सकारात्मकतेची नवी ऊर्जा देत आयुष्याला नव्या रंगांनी, नव्या ऊर्जेने सजवणारा एक अनोखा अनुभव अशा शब्दांत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी नाटकाचं भरभरून कौतुक केलं. “संपूर्ण प्रयोग फॅन्टास्टिक होता!” अशा शब्दांत बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी नाटकाला भरभरून दाद दिली.

२५ प्रयोगांचा यशस्वी प्रवास, रसिकांचे प्रेम आणि त्यातच पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याची कौतुकाची थाप! ‘एक तिची गोष्ट’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला याहून सुंदर भेट कोणती असू शकते! रौप्यमहोत्सवी टप्प्यावर मिळालेली ही शाबासकी ‘एक तिची गोष्ट’ च्या यशस्वी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा क्षण ठरली आहे.

या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर, उर्मिला कानिटकर, मनवा नाईक, स्मिता तांबे, शर्वरी पाटणकर, उमेश जाधव, सुशांत शेलार, मृणाल देशपांडे, दीपा चौधरी, सुखदा खांडकेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

Exit mobile version