unique love story’Kabhi Neem Neem Kabhi Shahad Shahad’ will soon be to audience :‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांकरता नेहमीच हृदयस्पर्शी कथा, अविस्मरणीय पात्रे आणि प्रेक्षकांना हृदयाला स्पर्श करणारे नाट्य पेश करत असते. प्रेमकथा असो वा नाट्य असो अथवा बदलत्या कुटुंबांच्या कहाण्या असोत, ‘स्टार प्लस’ वाहिनी नव्या, नव्या विषयांवर मालिका सादर करण्यात अग्रेसर आहे. हाच वारसा जपत ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांकरता ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही नवी मालिका सुरू करत आहे. या मालिकेत एक अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे, जी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल आणि प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवेल.
Video : मोदींनाही वाटतं होतं केदार जाधवनं भाजपात यावं; पक्षप्रवेशावेळी बावनकुळेंनी काय सांगितलं?
‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ या आगामी मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत प्रेक्षकांना मालिकेतील नाट्याची एक झलक पाहायला मिळेल. या मालिकेत उत्कट आणि दृढ इच्छाशक्ती असलेली- कथा ही महिला दाखविण्यात आली आहे, जिला रोपांचे संगोपन करणे अतिशय प्रिय आहे, आणि ते करताना कथाला एक शांतता लाभते, तिला एक उद्दिष्ट गवसते. निसर्गाशी कथाचे जे नाते आहे, त्या नात्यातून तिची आंतरिक शांतता आणि स्वतंत्र भावना प्रतिबिंबित होते. दुसरीकडे, उदय हा एक उमदा शेफ आहे, ज्याचा सुग्रास खाणे बनविण्यावर विश्वास आहे.
काळिमा फासणारी घटना! उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टरकडूनच अत्याचार
एकदा रस्त्यावर या दोघांची परस्परांशी टक्कर होते, आणि त्यात कथा तिच्याकरता मोलाचे असलेले जे रोप ती नेत होती, ते रोप उन्मळून पडते. कथाला राहवत नाही आणि ती उदयला उलटसुलट सुनावते आणि त्याचा अपमान करते.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या प्रोमोत कथाची लग्नाविषयीची उदासीनता व्यक्त झाली आहे आणि प्रेक्षकांचे लक्ष तिच्या स्वावलंबी जीवनशैलीकडेही वेधले जाते, तर उदयच्या शांत वर्तनातून या दोघांची व्यक्तिमत्त्वे किती परस्परविरोधी आहेत, ते ठसठशीतपणे जाणवते.
माजी आयपीएस शिवदीप लांडे आता राजकारण गाजविणार; बिहारमध्ये ‘हिंदू सेना’ पक्षाची स्थापना
‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ या मालिकेच्या कथेतून परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वे परस्परांकडे कशी आकर्षित होतात आणि त्यातून त्यांचे भावबंध कसे जुळून येतात, हे दाखवले आहे. हे अनोखे, अपारंपरिक नाते कसे फुलते हे पाहण्याकरता २१ एप्रिलपासून संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लस वाहिनीवर ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही मालिका पाहायला विसरू नका. ही मालिका, जी कधी खट्टी आहे, कधी मिठ्ठी आहे, मात्र नेहमीच वास्तववादी आहे.