नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगले यांनी संताप व्यक्त करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत नाटकाचे प्रयोग सुरु असून त्याबाबतचे अनुभवांचं काटेरी शब्दांत वैभव मांगलेंनी वर्णन केलं आहे.
आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेने कट कसा रचला ?
एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत आलेला अनुभव सांगताना वैभव यांना राग अनावर झाला. ते म्हणाले, “पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती”. अशा त्रासात प्रयोग पाहत होते.
गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण
एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले . पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक’. आम्ही विनंती केली की, आम्हाला ही त्रास होतोच आहे.
पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या जामिनावरुन वातावरण तापलं; सर्वोच्च न्यायालयालाच घेरलं
इथे येईपर्यंत माहित नव्हतं की, एसी नाहीये, आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले. त्यात हवेचे आगमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय.
Pune News : खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ जणींना वाचवण्यात यश; दोघींचा मृत्यू
कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसीची यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावरवर? या शब्दांत वैभव मांगले यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, नाट्यगृहातील या गैरसोयींबाबत वैभव मांगले यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. वैभव मांगलेंच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी देखील त्यांना ठिकठिकाणी आलेले अनुभव सांगितले आहेत.