पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या जामिनावरुन वातावरण तापलं; सर्वोच्च न्यायालयालाच घेरलं

पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या जामिनावरुन वातावरण तापलं; सर्वोच्च न्यायालयालाच घेरलं

Pakistan Crisis : पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court of Pakistan)जामीन मिळाल्यानंतर पीडीएमने (PDM) निदर्शने सुरू केली आहेत. पीडीएम समर्थकांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयालाही घेराव घातला आहे. विरोधी पक्षांच्या संघटना PDM मध्ये पाकिस्तान लोकशाही चळवळ पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल यासह अनेक पक्षांचा समावेश आहे.

ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच टक्के मागतायत : आव्हाड लवकरच नाव जाहीर करणार

दरम्यान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना जामीन मिळाला आहे. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना 23 मे पर्यंत जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबीसह इम्रान खानही उच्च न्यायालयात पोहोचले आहेत.

पीटीआय समर्थकांनीही विरोध सुरू केला आहे. ते म्हणतात की ते शांततेने आंदोलन करत आहेत. पीटीआयने या काळात अटक केलेल्या त्यांच्या नेत्यांची यादीही प्रसिद्ध केली.


यावेळी इम्रान खान म्हणाले की, त्यांच्या पक्ष पीटीआयचे सुमारे सात हजार कार्यकर्ते आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने पुढे म्हटले आहे की, सुरक्षा एजन्सी सर्वोच्च न्यायालयावर कब्जा करण्यासाठी आणि संविधान नष्ट करण्यासाठी गुंडांना मदत करत आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यघटना नष्ट झाली तर पाकिस्तानची स्वप्ने संपुष्टात येतील.

सुटकेनंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी आरोप केला की, लष्कराला त्यांचा पक्ष चिरडायचा आहे, संपवायचा आहे. राजकारणात उतरण्यासाठी सेनेला स्वतःचा पक्ष काढण्याचा सल्लाही इम्रान खान यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube