Download App

Shreyas Talpade: ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत रिलीज

Me Ranbhar Song Release Out: झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gaath Movie) या मराठी सिनेमातील पहिले प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day ) निमित्ताने रिलीज करण्यात आला आहे. ‘मी रानभर’ (Me Ranbhar Song) असे बोल असणारे हे प्रेमगीत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला मधुर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या प्रेमगीतासाठी साथ लाभली आहे.

हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे अतिशय सुंदर नृत्य बघण्याची संधी चाहत्यांना या प्रेमगीतातून पाहायला मिळणार आहे. या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात की, ” व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे प्रेमगीत चाहत्यांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या प्रेमगीताला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या प्रेमगीतात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गीतातून पाहायला मिळणार आहे.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फिल्म इंडस्ट्रीमधील क्यूट कपल्स

हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात की, ” अनोखी प्रेमकहाणी असणाऱ्या या सिनेमात हे गीत अतिशय चपखल बसत आहे. प्रेमाच्या तरल, हळुवार भावना यातून व्यक्त होत आहेत. श्रवणीय असे हे गाणे प्रेमीयुगुलांना नक्कीच आवडणार आहे. दरम्यान, 1 मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ सिनेमा सर्वत्र रिलीज होणार आहे.

follow us