व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फिल्म इंडस्ट्रीमधील क्यूट कपल्स

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फिल्म इंडस्ट्रीमधील क्यूट कपल्स

Valentine Day Special : चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर अनेक कलाकार एकत्र येतात आणि त्यातूनचं त्यांच सूत जुळतं. बॉलिवूडमध्ये अशी अनेक कपल्स नंतर रिअललाईफमध्ये लाईफपार्टनर बनली आहेत. या क्यूट कपल्सची (Bollywood Couples) लव्हस्टोरी कशी सुरु झाली याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चला, तर मग आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्ताने जाणून घेऊयात बॉलीवूडमधील अशाच काही लव्हस्टोरीबद्दल…

रितेश-जेनेलिया
सर्वात प्रथम बॉलीवूडमधील रोमँटिक कपल्स रितेश-जेनेलिया यांची लव्हस्टोरी पाहूया. दोघांची पहिली भेट 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेनेलिया आधी रितेशला खूप अहंकारी मानत होती. मात्र नंतर तिचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात दोघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळाली. लग्नापूर्वी दोघांनी जवळपास 9 वर्षे एकमेकांना डेट केले. यानंतर 2012 मध्ये त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.

Bade Miya Chhote Miya : अक्षय-टायगरने दिल्या व्हॅलेंटाईन डेच्या ब्रोमान्समय शुभेच्छा!

विकी-कतरिना
असं म्हणतात की ज्यांची लग्नगाठ स्वर्गात बांधली आहे ते भेटतातच. विकी कतरिनाची प्रेमकहाणी अशीच आहे. ‘मनमर्जियां’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कतरिनाने विकीला पहिल्यांदा पाहिले. विकीचा अभिनय पाहून कतरिना प्रभावित झाली. त्यांची पहिली भेट झोया अख्तरमुळे झाली. पहिल्याच भेटीत दोघेही प्रेमात पडले. लग्नाआधी जवळपास दोन वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी लग्न केले. विकी कतरिनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.

गौरी-शाहरुख
शाहरुखने गौरीला पहिल्यांदा 1984 मध्ये पंचशील क्लबमधी पार्टीत पाहिले होते. त्यावेळी शाहरुख 19 वर्षांचा होता आणि गौरी फक्त 14 वर्षांची होती. पार्टीत गौरी तिच्या एका मैत्रिणीसोबत डान्स करत होती. गौरीला पाहताच शाहरुख तिच्या प्रेमात पडला. दुसऱ्या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळाला. गौरीलाही शाहरुख आवडू लागला. फोनवर बोलणं, एकत्र फिरणं सुरु असताना एके दिवशी शाहरुखने गौरीला लग्नसाठी प्रपोज केलं. आणि तिनेही होकार दिला. मात्र वेगवेगळ्या धर्मामुळे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. मात्र दोघांच्या आग्रहापुढे घरच्यांना नमते घ्यावे लागले आणि त्यांनी लग्न केले.

शर्वरीने शेयर केले ‘व्हॅलेंटाईन डे’ पोस्टकार्ड : अ व्हिजुअल लव स्टोरी

अक्षय-ट्विंकल
अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लवस्टोरी जरा हटके होती. ट्विंकल खन्नाचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तिचे अक्षय कुमारशी प्रेमसंबंध जुळले. कॉफी विथ करणमध्ये अक्षय कुमारने याबाबत मोठा खुलासा केला होता. ट्विंकल खन्नाने मेला चित्रपट हिट झाला तर तुझ्याशी लग्न करणार नाही, असे बजावले होते. मात्र, मेला सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच पडला त्यामुळे दोघांच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला.

सचिन-सुप्रिया
मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय जोडी सचिन-सुप्रिया पिळगावकर यांची आहे. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा त्यांची भेट झाली आणि प्रेमात पडले. पण त्यावेळी सुप्रिया यांना वाटलं होतं की ते आधीच विवाहित असतील. आपण अविवाहित आहोत हे सचिन पिळगावकरांना त्यांना पटवून द्यावं लागलं. अखेर 1 डिसेंबर 1985 मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली. सुप्रिया सचिनपेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत.

Kanni Movie: व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘कन्नी’ सिनेमाच्या टीमने केलं जोरदार सेलिब्रेशन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube