कुणी ताजमहाल बांधला तर, कुणाचा बळी गेला; ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जाणून घ्या अजरामर प्रेम कथा

कुणी ताजमहाल बांधला तर, कुणाचा बळी गेला; ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जाणून घ्या अजरामर प्रेम कथा

Valentine Day Special 5 Love Story in History : ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस जरी पाश्चिमात्य संस्कृतीतून आपल्याकडे आला आहे. मात्र भारतामध्ये देखील प्रेमाला विशेष स्थान आहे. ज्यामध्ये विविध नात्यांमधील प्रेम असतं. मात्र प्रियकर आणि प्रेयसी, पती-पत्नी यांच्यातील प्रेमाची असंख्य उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ज्याचा इतिहास देखील साक्षीदार आहे. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डे निमित्त जाणून घेऊया अशा काही ऐतिहासिक प्रेमकथा ज्या फक्त भारतात नाहीतर जगभरात गाजल्या.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा – भाजप खासदार संबित पात्रा यांना मिळणार झेड श्रेणीची सुरक्षा

1 शहाजहान आणि मुमताज महल

मुघलांच्या इतिहासातील नेहमीच चर्चेत राहिलेली ऐतिहासिक गोष्ट आणि प्रेम कथा म्हणजे बादशहा शहाजहान आणि बेगम मुमताज महल यांची प्रेम कथा. जगभरात प्रसिद्ध आहे. ज्याची जगप्रसिद्ध आठवण म्हणजे आग्र्यातील ताजमहल. असं सांगितलं जातं की, मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहानने तिच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी तिचं स्मारक म्हणून हा महाल बनवला. अत्यंत सुरेख आणि जागतिक दर्जाचं बांधकाम असलेला हा ताजमहल फक्त प्रेमातच नाही. तर वास्तु विशारद आणि स्थापत्य कलेचा एकमेवाद्वितीय उदाहरण ठरला आहे. ताजमहल हा जगातील आठ आश्चर्यंपैकी एक मानला जातो. तसेच त्याला युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये देखील स्थान आहे.

एकरकमी एफआरपीच्या याचिकेत अचानक साखर संघाची हस्तक्षेप याचिका; राजू शेट्टी यांचा कडाडून विरोध

2 बाजीराव आणि मस्तानी

इतिहासातील आणखी एक गाजलेली प्रेम कथा म्हणजे थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांची. ही प्रेम कथा केवळ एका स्त्री-पुरुषांची नव्हती. तर दोन वेगवेगळ्या साम्राज्यातील तसेच धर्मातील प्रियकर आणि प्रेयसी होती. मराठा साम्राज्याचा कारभार जेव्हा पेशव्यांच्या हाती आला. तेव्हा मराठा साम्राज्याला अत्यंत उंचीवर पोहोचवण्याचं काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं. याच त्यांच्या यशस्वी आणि लढवय्या कारकीर्दी दरम्यान त्यांना मस्तानी भेटली.

खासदारांनी काय खावं, कुठे जावं ठाकरेच ठरवतात; अदित्य ठाकरेंना शिंदेंचा टोला

मुघलांच्या विरुद्ध राजा छत्रसालाला मदत केल्याबद्दल छत्रसालाच्या यवन असलेल्या पत्नीपासून झालेल्या लढवय्या अशा मुलीला महाराष्ट्रात पाठवण्यात आलं होतं. तसेच बुंदेलखंडामध्येच मस्तानी आणि बाजीरावांची भेट झाली होती. त्यावेळेस त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर मराठा साम्राज्यामध्ये त्यांना अत्यंत विरोधाला सामोरे जावं लागलं. मात्र त्यांची ही प्रेम कहानी कायम अजरामर राहिली.

3 हिर-रांझा

त्यानंतर येतात ते हीर आणि रांझा पंजाबच्या इतिहासामध्ये होऊन गेलेली ही अजरामर प्रेमकथा अत्यंत प्रसिद्ध आहे. या कथेमध्ये प्रेम, त्याग आणि संघर्ष हे सर्व पाहायला मिळतो. हे जोडपदेखील वेगळ्या समाजातून आणि वेगळ्या कुटुंबांमधून असल्याने त्यांना अत्यंत विरोध झाला. मात्र त्यांच्या प्रेम कथेची उदाहरणं आजही दिली जातात.

4 सलीम आणि अनारकली

सलीम आणि अनारकली यांची अकबरकालीन प्रेमकथा आहे. भारतीय इतिहासातील अत्यंत चर्चेतील प्रेम कहानी आहे. अनारकली एक प्रसिद्ध आणि अत्यंत सुंदर अशी नृत्यांगना होती. जिचं अकबराचा मुलगा सलीम याच्यावरती प्रेम जडलं होतं. मात्र सलीम हा राजाचा मुलगा आणि ती केवळ एक नृत्यांगणा असल्याने राजकीय आणि सामाजिक दबावाने त्यांना वेगळं केलं. त्यांच्यावर प्रेम कथेला पूर्ण होऊ दिले नाही. ज्यामध्ये अनारकलीचा झालेला अत्यंत दुर्दैवी अंत या प्रेमकथेला अमर बनवून गेला.

5 पृथ्वीराज चौहान आणि संयुक्ता

त्यानंतरची आणखी एक ऐतिहासिक प्रेम कथा आहे ती म्हणजे पृथ्वीराज चौहान आणि संयुक्ता मध्यकालीन भारतातील एक प्रसिद्ध रजपूत राजा म्हणजे पृथ्वीराज चौहान. तर त्यांची प्रेमिका असलेली संयुक्ता ही कन्नोजचे राजे जयचंदची मुलगी होती. त्यांच्या प्रेमामध्ये देखील अत्यंत अडथळे आल्यानंतर शेवटी त्यांचा विवाह झाला. ही प्रेमकथा देखील अनेकदा उदाहरण म्हणून सांगितले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube