Kanni Movie: व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘कन्नी’ सिनेमाच्या टीमने केलं जोरदार सेलिब्रेशन

Kanni Movie: व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘कन्नी’ सिनेमाच्या टीमने केलं जोरदार सेलिब्रेशन

Valentine Day Celebration On Kanni Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ ( Kanni Movie) चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे (Rita Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी काही मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल केली.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी राजानी, अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.

यावर दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी 8 मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.’

रणबीरच्या ‘रामायण’मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे अमिताभ यांचा पत्ता कट?

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या ‘कन्नी’ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज