शर्वरीने शेयर केले ‘व्हॅलेंटाईन डे’ पोस्टकार्ड : अ व्हिजुअल लव स्टोरी

शर्वरीने शेयर केले ‘व्हॅलेंटाईन डे’ पोस्टकार्ड : अ व्हिजुअल लव स्टोरी

Valentine Day Special : प्रेम (Love)आणि सर्जनशीलतेच्या उत्सवात अभिनेत्री शरवरी वाघ (Sharwari Wagh)हीने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram)तीन नयनरम्य लँडस्केपचा कोलाज (Landscape collage)शेअर केला आहे. हे लैंडस्केप तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिच्या विंटेज कॅमेऱ्याच्या (Vintage Camera)लेन्समधून कॅप्चर केले आहे.

भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम

अभिनेत्री शरवरी वाघ हीला फक्त अभिनयाचीच नाही तर फोटोग्राफीची देखील चांगलीच आवड आहे. ती फोटोग्राफीचं कौशल्य अंगीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तीने शेअर केलेला प्रत्येक फोटो व्हायब्रेंट कलर्स आणि निसर्गाने बहरला आहे .

फोटोग्राफीबद्दल शरवरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हाही मी कुठेही जाते, तेव्हा माझ्याकडे कॅमेरा घेऊन जाण्याचा हट्ट असतो. माझ्याकडे मॅन्युअल विंटेज कॅमेरा आहे. आणि तो खरोखरच रोमांचक आहे. पुढे काय क्लिक करायचे याचा मी सतत विचार करत असते.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक

शरवरीची अमर्याद प्रतिभा तिच्या नवनवीन कौशल्यांच्या अथक प्रयत्नातून दिसून येते. फोटोग्राफीच्या आवडीसोबतच तिला बेकिंगच्या कलेमध्येही विशेष आवड आहे. ते करत असताना तीला चांगला आनंद मिळतो आणि पियानो वाजवण्यातही तिला आनंद मिळतो.

वर्क फ्रंटवर शरवरी 12 जुलै 2024 रोजी रिलीज होणाऱ्या निखिल अडवाणीच्या वेदामध्ये शरवरी दिसणार आहे. 2024 मध्ये फ्लोरवर जाणाऱ्या YRF च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्टसोबत ‘सुपर-एजंट’ म्हणूनही शरवरी दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज