भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम

भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम

NCP Rajyasabha Candiate : येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. एकीकडे महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप राज्यसभेसाठीच्या उमदेवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी एक उमेदवार (NCP Rajyasabha Candiate) ठरवायचा आहे मात्र, राष्ट्रवादीत इच्छूकांची संख्या अनेक असल्याने अद्याप उमेदवार ठरला नसल्याचं बोललं जात आहे.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी अन् अजित गोपछडे होणार खासदार! भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि नूकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून अद्याप चौथ्या जागेसाठी सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत…’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अनेक आमदारांसह खासदारांनी अजित पवार गटाचं नेतृत्व मान्य केल्याचं पाहायला मिळालं. आता महायुतीमध्ये असताना राष्ट्रवादीला राज्यसभेची एक जागा देण्यात आली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार, परांजपे, नवाब मलिक, बाबा सिद्धिकींसह, समीर भुजबळ, अशी नेतेमंडळी इच्छूक आहेत.

‘विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी मोदींना सांगतो’; आई, अन् मुलाची राजकीय कारकीर्द काढत राऊतांचा हल्लाबोल

अद्याप राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठीचा तिढा सुटला नसल्यामुळेच अद्याप उमेदवार ठरला नसल्याचं बोललं जात आहे. आता राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उद्या 15 फेब्रुवारीचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आता उद्यापर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार ठरणार का? की या एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. तो उमेदवार कोण आहे? यावर अद्याप सस्पेन्स कायम ठेवण्यात आला असून गुरुवारपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या इच्छुकांची नावे अनेक आणि जागा एक अशी परिस्थिती राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा या एका जागेचा तिढा कधीपर्यंत सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज