‘विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी मोदींना सांगतो’; आई, अन् मुलाची राजकीय कारकीर्द काढत राऊतांचा हल्लाबोल

‘विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी मोदींना सांगतो’; आई, अन् मुलाची राजकीय कारकीर्द काढत राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Radhakrushna Vikhe : विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी पंतप्रधान मोदींना सांगतो, म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या घराणेशाहीवरुन हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून राज्यसभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमधील शिर्डीत आज जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते.

शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर धडकलं; मोर्चावर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

संजय राऊत म्हणाले, राम मंदिराच्या निमित्ताने अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखेंनी साखर आणि डाळ वाटप केली आहे. मात्र, लोकांनी ही डाळ आणि साखर परत पाठवली आहे. मला पद्मश्री बाळासाहेबांबद्दल काय बोलायंच नाही पण सध्या जी घराणेशाही चालली आहे त्या घराणेशाहीबद्दल मोदींना माहित आहे नसेल तर आम्ही त्यांना सांगतो, राधाकृष्ण विखे मंत्री, मुलगा खासदार, पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष, असल्याचं हातात कागद घेत राऊतांनी पाढाच वाचला आहे.

तसेच मुलगी सुश्मिताच्या नावावर गंगापूर साखर कारखाना, दुसऱ्या मुलीच्या नावावर राहुरी कारखाना, मेहुणा राजेश परझणे महानंदच्या अध्यक्षपदी, भाऊ मेडकिल कॉलेज सांभाळतो, केंद्राने मेडिकल कॉलेज मंजूर करुनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी आपल्याला जागा मिळू देत नाहीत नाहीतर यांचा धंदा बंद होईल, त्यामुळे मिळू देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

राज्यात महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित असलेला तलाठी भरती घोटाळा हा देशातला सर्वांत भयंकर घोटाळा असून त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे, या भरतीत घराणेशाहीने प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. महाराष्ट्रातून हजारो तरुणांचं आयुष्य त्यांनी रस्त्यावर आणलं आहे. प्रवरा साखर कारखान्यात 191 कोटींचा घोटाळा केला असून कारखान्याला 895 कोटी कर्ज आणि इतर देणी असतानाही तीन वर्षांच्या ऑडिटमध्ये खोटी आकडेमोड करुन कारखान्याला फायदा असल्याचं या लोकांनी दाखवलं असल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

डॉ. झाकीर नाईकांकडून विखे ट्रस्टला 5 कोटी रुपये…
कुठे ईडी, सीबीआय, गृहमंत्री फडणवीस ऐकतायं ना. तुम्ही विरोधकांच्या मागे लागता. लहान ृ-लहान खटले बाहेर काढता, गणेश साखर कारखान्यात 112 कोटी रुपयांचा विखेंनी काळा बाजार केलायं. दहशतवादाला अर्थपूरवठा करणारा डॉ. झाकीर नाईक त्याचे दाऊदशी, पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध आहेत, त्या त्या झाकीर नाईककडून विखे पाटील ट्रस्टला 5 कोटी रुपये मिळालेले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज