किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत…’
Kiran Mane Post: ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम जोरदार चर्चेत असतात. (Maharashtra politics) विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा मोठा सामना करावा लागतो. पण समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आणि आता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अभिनेते किरण माने यांनी रोखठोक विधान केले आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु आहे. काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे नेते अशोक चव्हाण यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. यावर आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परखड मत माडलं आहे.म्हणाले की ‘ते’ एक ड्रेनेज झालं आहे. सगळ्या टाकाऊ गोष्टी सामाऊन घेत आहे. लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत आहे. अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.
एका दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने म्हणाले की,” मी अभिनयासह परिवर्तनाच्या लढाईत काम करत आहे. आजची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. आज आपल्याच माणसात फूट पाडली जात आहे. जातीधर्मावरुन द्वेश निर्माण केला जात आहे. या गढूळलेल्या आणि गलिच्छ वातावरणात खूप अस्वस्थता आहे. कलाकार हा कायम संवेदनशील असतो. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, पुल देशपांडे अशा अनेक मंडळींनी आजवर राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलेलं आहे.
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
सध्या अभिनेता अभिनयप्रवासाला कधीही ब्रेक लागणार नाही. राजकारण सांभाळून अभिनय करत राहणार. नाटक, सिनेमा आणि सिरीयल या गोष्टी सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सध्या अभिनयासह राजकारणालाही प्राधान्य दिलं जाणार आहे. लवकरच मी एक नाटक करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.