Vanarlingi Khada Parsi Promo: 1983 साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे, (Social Media) त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. (Khada Parsi Promo) वानरलिंगी (किंवा खडा पारशी) (Vanarlingi ) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर करण्याच्या मोहिमेचे हे एक उत्कंठावर्धक प्रोमो रिलीज (Promo Release ) करण्यात आला आहे.
या मोहिमेत जी तंत्रे वापरली गेली त्यांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अन्यही ठिकाणच्या प्रस्तरारोहींना, तोपर्यंत अजिंक्य समजल्या गेलेली शिखरे शक्यतेच्या टप्यात आणली. हा माहितीपट प्रा. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेची सविस्तर माहिती देतो, ज्यासाठी लढवलेल्या कल्पना, त्या प्रत्यक्षात उत्तरवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत पात चित्रित करण्यात आली आहे. धातुशास्त्र, प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादनाचे तंत्रज्ञान या सगळ्याचा या मोहिमेच्या यशासाठी उपयोग करून घेण्यात आला. हे विशेष.
एक अशी वस्तू या मोहिमेत वापरली गेली, जी भारतात उपलब्ध नव्हती. एवढेच नव्हे तर त्याच्या परदेशातील वापराविषयीही माहिती मिळवणं कठीण गेलं, त्यामुळे त्याचा नमूना मिळवणे, कोणता धातू त्यासाठी वापरता आहे ते शोधणे, त्याचा उपलब्ध पर्याय शोधणे, उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया अजमावणे, त्याच्या चाचण्या घेणे, हे सारेच आव्हानात्मक होते. अशा चाचण्या प्रमाणित करण्यासाठी त्या काळी प्रयोगशाळाही नव्हत्या (आजही नाहीत), त्यामुळे आरोहणाच्या आधारभूत गोष्टी लक्षात घेऊन तपासण्या करायच्या आणि प्रत्यक्ष चढाईत वापरण्यासंबंधी उत्पादित केलेल्या वस्तूंची गुणवत्ता पारखायची, हे अत्यंत जोखमीचे काम होते चुकीचा निर्णय आरोहीच्या जिवावर बेतण्पाची शक्यता होती.
Prerna Arora : दिव्या खोसला कुमारच्या सिनेमाविषयी पहिल्यांदाच बोलून दाखवली मनातली सल, म्हणाली
अनेक दिवसांची चढ़ाई, रात्रीच्या अंधारात केलेले आरोहण, आणि जेमतेम पाऊल मावेल एवढ्या जागेवर उभ्या कड्यावर रात्र काढणे अशा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी या पहिल्यांदाच घडल्या, व्यवस्थापन, नेतृत्व आणि कार्यवाही या सगळ्याच दृष्टीने ती एक अनुकरणीय मोहीम होती. सृजनशीलता, अनिश्चिततेचा सामना, निर्णयक्षमता यांची कसोटी त्यात लागली. या पयशानंतर आपला अनुभव आपि यशस्वी ठरलेलं तंत्रज्ञान मोकळेपणाने इतरांसोबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेअर करताना या मंडळींनी हात आखडता घेतला नाही.
शनिवार 16मार्च 2024 या दिवशी संध्याकाळी 7 वाजता या प्रिमियरचे प्रदर्शन होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रथितयश दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी केले आहे. पहिल्या प्रदर्शनानंतर हा लघुचित्रपट आमच्या पूट्यूब पहायला मिळेल. पा लघुचित्रपटाबद्दलची कल्पना येण्यासाठी एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.