Udne Ki Asha Promo: ‘स्टार प्लस’वरील ‘उडने की आशा’ या नव्या मालिकेचा रंजक प्रोमो रिलीज
Udne Ki Asha Promo Release: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील नातेसंबंधांवर बेतलेल्या ‘उडने की आशा’ (Udne Ki Asha Serial) या नव्या मालिकेचा रंजक प्रोमो प्रदर्शित (Udne Ki Asha Promo) झाला आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (Kanwar Dhillon) आणि नेहा हसोरा (Neha Hasora) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सायलीच्या भूमिकेतील अभिनेत्री नेहा हसोरा आणि सचिनची भूमिका निभावणारा कंवर ढिल्लन यांनी या ‘प्रोमो’विषयी असलेली त्यांची उत्कंठा शेअर केली!
‘स्टार प्लस’ वाहिनी आपल्या प्रेक्षकांकरता वेधक आणि स्वारस्यपूर्ण विषयांवरील मनोरंजनपर मालिका सादर करण्याकरता ओळखली जाते. नात्यांची गुंतागुंत अलवारपणे उलगडणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या भावभावनांना साद घालतात. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर एकाहून एक सरस मालिका आहेत, ज्यांचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे रंजन करणे इतकाच नाही तर त्यांचे सबलीकरण करणे हाही आहे. या मालिकांमध्ये अनुपमा, गुम है किसीके प्यार में, यह रिश्ता क्या कहलाता है, तेरी मेरी दुरियाँ, इमली, पंड्या स्टोअर, बातें कुछ अनकहीसी, आँख मिचोली, आणि ये है चाहतें या मालिकांचा समावेश आहे, ज्या कौटुंबिक नाट्य व प्रेमकथा यांवर बेतलेल्या आहेत आणि प्रेक्षकांकडून या मालिकांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.
प्रेक्षकांसमोर उत्तम दर्जाच्या मालिका सादर करण्याची परंपरा सुरू ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका पेश केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका वठवल्या आहेत. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेत सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत सादर केली जाणार आहे.
या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा दिसून येत आहेत. मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेचा एक रंजक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायलीच्या आयुष्याची झलक पाहायला मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, हेही समजेल. एकीकडे सायली जबाबदाऱ्यांचे महत्त्व जाणणारी व्यक्ती आहे, तर दुसरीकडे सचिन बेफिकीर वृत्तीचा आहे. सचिन आणि सायली या अत्यंत दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र आयुष्य व्यतीत करण्याचा- लग्नाचा निर्णय कसा घेतात हेही या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळेल. सचिन आणि सायली त्यांच्या भावनिक प्रवासाला कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरेल. सचिन आणि सायली परस्परांना स्वातंत्र्य देतील का, या प्रश्नाचे उत्तर या मालिकेत दडलेले आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेतील नेहा हसोरा ऊर्फ सायलीने अधिक माहिती देताना सांगितले, “मला या प्रोमोबाबत अत्यंत उत्सुकता आहे. अखेरीस हा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मी सायली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सायली ही एक मेहनती मुलगी आहे, जी तिच्या कुटुंबाला आधार देण्याकरता प्रत्येक काम, प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडते. तिचा संसार हा तिचा प्राधान्यक्रम आहे. सायलीला तिच्या पतीत काही गुण असावेत, असे वाटते. आयुष्याचा जोडीदार म्हणून तिला सचिन लाभला आहे. ज्याचे गुण, स्वभाव, प्रवृत्ती सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी आहे. सायलीची भूमिका परिपूर्णतेने वठविण्याकरता मी मराठी शब्दकोशाचा बारकाईने वापर केला. सायली फुलविक्रेती असल्याने फुलांचे हार कसे बनवायचे तेही मी शिकले. हा एक वेगळा अनुभव आहे आणि मी या मालिकेचा एक भाग असल्याबाबत मी कृतज्ञ आहे. ही भूमिका वठवण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते. ‘स्टार प्लस’च्या ‘उडने की आशा’ या मालिकेतील सचिन आणि सायलीच्या आयुष्यात उलगडत जाणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होण्याकरता सज्ज व्हा.”
कियारा नाही तर ‘ही’ अभिनेत्री होणार ‘भूल भुलैया 3’ची मंजुलिका; कार्तिकने थेट रिलीज डेट केली जाहीर
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेतील सचिनची भूमिका करणाऱ्या कंवर ढिल्लन याने नमूद केले, “मी या मालिकेत सचिनची व्यक्तिरेखा साकारणार आहे; तो वेगळ्या वातावरणात वाढला आहे. त्याच्या आईने त्याला नाकारल्याने सचिनचे संगोपन त्याच्या आजीने केले आहे. सचिनला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. तो त्याच्या वडिलांच्या निकट आहे. सचिनचा लग्न आणि प्रेमावर विश्वास नसून तो बेफिकीर वृत्तीचा आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्याने मला मराठी भाषा शिकणे आणि मी जे पात्र साकारत आहे, ते पात्र अधिक अस्सलपणे वठवणे सोपे झाले. सचिनची भूमिका माझ्या नशिबात होती आणि ही भूमिका साकारण्यात व मालिकेचा भाग होण्यात मी खरोखरच स्वत:ला धन्य मानतो. ‘उडने की आशा’ ही एक विशिष्ट कथानक असलेली अनोखा मालिका आहे, जी प्रेक्षकांना त्यांच्या टीव्हीच्या पडद्यावर नक्कीच खिळवून ठेवेल.”
या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेतून एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या बेफिकीर पतीला जबाबदार व्यक्तीत कसे परावर्तित करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. कंवर ढिल्लन यांनी सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे. राहुल कुमार तिवारी निर्मित, ‘उडने की आशा’ लवकरच ‘स्टार प्लस’वर प्रसारित होणार आहे.