Download App

जॅकी आणि वाशू भगनानी यांनी अली अब्बास जफरविरोधात केली तक्रार दाखल, काय आहे प्रकरण घ्या जाणून …

BMCM: 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकात मतभेद झाल्याचं आता समजत आहे.

Vashu Bhagnani Accused Director Ali Abbas Zafar: पूजा एंटरटेनमेंटचे वाशू भगनानी आणि (Vashu Bhagnani ) त्यांचा लेक जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) यांनी चित्रपट निर्माता अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांच्यावर गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. 3 सप्टेंबर रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये जफरने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या (Bade Miyan Chhote Miyan) शूटिंगदरम्यान सुमारे 9.50 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला होता.


वाशू भगनानी आणि त्यांच्या लेकाच्या तक्रारीत अली अब्बास यांच्यावर बळजबरी, विश्वासाचा भंग, खंडणी, ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी धमकी, छळ, गुन्हेगारी बदनामी आणि मनी लाँड्रिंग असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जफरने अबुधाबी येथील एका शेल कंपनीच्या माध्यमातून या निधीचा वापर केल्याचा दावा भगनानीच्या वतीने केला जात आहे. मुंबईचे वांद्रे पोलीस अली अब्बास जफरला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

अली अब्बास यांनीही तक्रार केली

अली अब्बास यांनीही भगनानीविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यात त्याने दावा केला आहे की, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ दिग्दर्शित करण्यासाठी आपल्याला 7.30 कोटी रुपये शुल्क मिळालेले नाही. मिळालेल्या माहितीच्या वृत्तानुसार, अलीने डायरेक्टर्स असोसिएशनकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईज (FWICE) ने वाशू भगनानी यांना पत्र पाठवून अली अब्बासची थकबाकी न भरण्याचे कारण विचारले आहे.

Bade Miya Chote Miya साठी पृथ्वीराज सुकुमारनकडून टायगरवर कौतुकाचा वर्षाव

अली अब्बास यांनी पैसे न दिल्याचा आरोप पूजा एन्टरटेन्मेंटने फेटाळला आहे. वाशूच्या कंपनीच्या वतीने अलीने थकबाकी भरण्याबाबत केलेले सर्व दावे खोटे असून त्यांच्याकडे याबाबत काही पुरावे असतील तर ते सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांची भूमिका होती. हा चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा रिमेक एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला असून आता यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

follow us