Download App

‘बॅड न्यूज’चा चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जलवा; विकीच्या चित्रपटाची दमदार कमाई, वाचा आकडे

Bad Newz: 'बॅड न्यूज'च्या चौथ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 1.17 कोटींची कमाई केली आहे.

Bad Newz Box Office Collection Day 4: विकी कौशलचा (Vicky Kaushal) चित्रपट ‘बॅड न्यूज’ (Bad Newz ) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई करत आहे. हा रोम-कॉम चित्रपट विकी कौशलसाठी खूप लकी ठरत आहे. पहिल्या दिवशी सर्वोत्कृष्ट सलामीवीराचा किताब पटकावण्यासोबतच ‘बॅड न्यूज’ (Bad Newz) अनेक विक्रम करत आहे.


सॅकनिकच्या अहवालावर नजर टाकली तर, बॅड न्यूज’ (Bad Newz )ने पहिल्या दिवशी 8.3 कोटींची ओपनिंग घेतली. याआधी विकी कौशलच्या कोणत्याही चित्रपटाला इतकी चांगली ओपनिंग मिळाली नव्हती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.25 कोटींचा व्यवसाय केला आणि तिसऱ्या दिवशी 11.15 कोटींची दमदार कमाई केली. आता ‘बॅड न्यूज’च्या चौथ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 1.17 कोटींची कमाई केली आहे.

सॅम बहादूरचा विक्रम मोडला

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बॅड न्यूज’चे बजेट 75-80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. केवळ चार दिवसांत ‘बॅड न्यूज’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 30.87 कोटींची कमाई केली आहे. यासह विकी कौशलने त्याच्या शेवटच्या हिट चित्रपट सॅम बहादूरचा विक्रम मोडला आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या सॅम बहादूर या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर 29.05 कोटींचा व्यवसाय केला.

Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’चा खेळ खल्लास! पाचव्या दिवशी कमाईत घसरण

दिग्दर्शक आणि स्टार कास्ट

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. हा एक रोमान्स-कॉमेडी चित्रपट आहे ज्यात विकी कौशल व्यतिरिक्त अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि एमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नेहा धुपिया, शीबा चड्ढा आणि फैसल रशीद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us