Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’चा खेळ खल्लास! पाचव्या दिवशी कमाईत घसरण

Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’चा खेळ खल्लास! पाचव्या दिवशी कमाईत घसरण

Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्समुळे या चित्रपटाला चांगलच ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Raut (@omraut)


‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५ दिवस पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू कमी होत आहे. ‘आदिपुरुष’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ८६.७५ कोटी, दुसरा दिवस ६५.२५ कोटी, तिसरा दिवस २९.०३ कोटी, चौथ्या दिवशी १६ कोटी आणि पाचव्या दिवशी १०.८० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने २४७.९० कोटींचा गल्ला कमावला आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ऑल इंडिया इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे. या सर्व गोष्टींचा चित्रपटाच्या कमाईवर मात्र मोठा परिणाम होत आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा चित्रपट आता किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळाला होता. हिंदीत या सिनेमाने ३७.२५ कोटी आणि तेलुगूमध्ये ४८ कोटींची मोठी कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने १४० कोटींचा मोठा गल्ला जमवलाआहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube