Download App

‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील टॉवेल फाइट सीनवर विकीने सोडले मौन

Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. 12 नोव्हेंबरला तिचा आणि भाईजानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ (Tiger 3) सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. (Tiger 3 Movie) चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने मोठा गल्ला कमावला आहे. सिनेमासोबतच यातील कतरिनाच्या टॉवेल फाइट सीनची चर्चा जोरदार रंगली आहे. या सीनवर कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आता थेटच सांगितले आहे.


अलीकडेच विकीने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने ‘टायगर 3’ मधील कतरिनाच्या टॉवेल फाइट सीनवर मौन सोडले आहे. विकी म्हणाला की, मी ‘टायगर 3 च्या स्क्रीनिंगला गेलो होतो आणि आम्ही सिनेमा बघत होतो. जेव्हा मी सिनेमातील कतरिनाचा टॉवेल फाइट सीन बघितला. त्यावेळेस मी तिला म्हणालो की, आजपासून मी तुझ्यासोबत कोणतंच भांडण करणार नाही. कारण- तू मला अशा प्रकारे मारावं, अशी माझी बिलकूल इच्छा नाही. मला वाटलं ज्या प्रकारे तिनं हा सीन शूट केला तो खरंच अविश्वसनीय आहे. कतरिना बॉलीवूडमधील सगळ्यात मोठी अॅक्शन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मला तिच्या कामावर आणि मेहनतीवर गर्व आहे. आणि तिचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे, असे भाष्य विकी कौशलने केले आहे.

‘टायगर 3’च्या कमाईबद्दल सांगायचं झालं, तर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.50 कोटींचा गल्ला कमावला आहे. परंतु, दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी या सिनेमाने केवळ 2.25 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 276.25 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

War 2: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार अन्…; हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

विकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याचा ‘सॅम बहादूर’ सिनेमा 1 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विकीने भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची मुख्य भूमिका साकारली आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आणि त्याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ सिनेमाची टक्कर पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us