मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर अभिनेत्री प्रजक्ता माळीने (Prajakta Mali) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नावाचा उल्लेख फक्त आणि फक्त टीआरपीसाठी केला असून, सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी प्राजक्ता माळीने केली आहे. तसेच योग्य कारवाईसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र देणार असल्याचेही प्राजक्ताने सांगितले. तसेच मला जर न्याय मिळाला नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून मी कलाक्षेत्रातील महिलांसाठी खंबीरपणे नेतृत्व करेल असेही प्राजक्ताने सांगितले. या कठीणकाळात सर्व कलाकार माझ्या पाठीशी उभे असल्याचेही तिने सांगितले. (Marathi Actress Prajakta Mali Press Conference )
Video : ‘पंकुताई संतोषच्या घरी का नाही गेला’? मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल
प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत काय म्हणाली?
– आमदार सुरेश धस यांनी जी टिपण्णी केली त्याचा निषेध करण्यासाठी मी आले आहे
– आमचं कलाक्षेत्र बदनाम नाही, परंतू अशा माणसांमुळे कलाक्षेत्र बदनाम होत आहे असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
– अफवांकडे दुर्लक्ष करून शांत बसले, पण सुरेश धस यांनी वक्तव्य केल्यामुळे तुमच्या समोर यावं लागलं
– सुरेश धस यांना प्रश्न राजकारण्यांवर तुम्ही टीकाटिपणी करा मात्र कलाकारांना यात का खेचतात?
– परळीमध्ये महिला कलाकारांची नावे येतात पुरुष कलाकार गेले नाही का, त्यांची नावे का घेत नाही.
– स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी धस यांनी महिलांची नावे घेतली.
– महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारचे कृत्य शोभत नाही.
– महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही तर, त्यांच्या कर्तृत्वावरदेखील शिंतोडे उडवत असल्याचा आरोप प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे.
– कुस्तत टिपण्णीचा निषेध करते तसेच सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी