Vidula, Neha, and Ruchira’s stylish chemistry is the talk of the town! : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी चित्रपटातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोव्याच्या मस्तीने, भन्नाट संगीताने आणि तरुणाईला साद घालणाऱ्या सादरीकरणामुळे ही गाणी चांगलीच चर्चेत आली. आता या चित्रपटातील आणखी एक खास गाणे ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजातील या जबरदस्त गाण्याला अनुराग गोडबोले यांनी तसेच एनर्जेटिक संगीत दिले असून, गाण्याचे बोल विजू माने यांनी लिहिले आहेत.
या गाण्यात गोव्याच्या रंगतदार वातावरणाची, समुद्रकिनाऱ्यावरील बेफिकीर क्षणांची आणि मैत्रिणींच्या धमाल ट्रिपची झलक पाहायला मिळते. विदुला चौघुले, नेहा खान आणि रुचिरा जाधव यांची गर्ल गँग या गाण्यात फुल्ल ऑन एन्जॉयमेंट करताना दिसते. तिघींचे आकर्षक लुक्स, ग्लॅमरस स्टाईल, उत्साहाने भरलेली ऊर्जा आणि स्क्रीनवरील सहज वावर गाण्याला अधिक रंगतदार बनवतो. मैत्री आणि गोव्याच्या मस्त वाईब्सचा सुंदर मिलाफ असलेले हे गाणे ऐकतानाच पाय ठेका धरू लागतात.
एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम
याविषयी दिग्दर्शक, गीतकार विजू माने म्हणाले, ‘’या गाण्यामागे एक विचार होता. पडद्यावर दिसणाऱ्या रंगीबेरंगी, ग्लॅमरस दृश्यांच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारा एक प्रयोग करून पाहायचा होता. त्याचबरोबर हा चित्रपट ज्या तरुणांसाठी बनवला आहे, त्या महाराष्ट्रातील तरुणांसमोर आज एक अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं जुळत नाहीत. पडद्यावर सुंदर मुली, लग्नाचे प्रसंग आणि आनंदी वातावरण पाहताना प्रत्येक तरुणाच्या मनात एक सकारात्मक भावना जागी होते की, आपल्या आयुष्यातही अशीच एक मुलगी येईल. पडद्यावर सिनेमा पाहाताना निर्माण होणारी ही आशा, ती उर्मी आणि ती भावना पकडण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला आहे.”
वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच 31 जुलै रोजी प्रदर्शित होणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट मित्रमंडळीसाठी एक भन्नाट सिनेमॅटिक ट्रीट ठरणार आहे. मैत्री, धम्माल, नॉस्टॅल्जिया आणि गोव्याच्या मस्तीचा फुल्ल डोस देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक अविस्मरणीय ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.
विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, विदुला चौघुले, नेहा खान आणि रुचिरा जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
