‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’साठी, आमिर खानला कसे राजी केले, वीर दासने सांगितला किस्सा …..

वीर दास हे अलीकडेच नवीन डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस संदर्भात आमिर खान यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल खुलून बोलले.

Untitled Design   2026 01 07T151754.143

Untitled Design 2026 01 07T151754.143

Vir Das tells the story of how he prepared Aamir Khan : वीर दास हे अलीकडेच नवीन डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस संदर्भात आमिर खान यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल खुलून बोलले. त्यांनी सांगितले की जेव्हा एखादा सुपरस्टार एखाद्या प्रोजेक्टवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो, तेव्हा तो पूर्ण मनापासून त्या प्रोजेक्टला साथ देतो. त्या क्षणाला आठवत विर यांनी सांगितले की , आमिर खान ज्या उंचीवर आहेत, त्यामुळे त्यांच्याशी भेटायला जाणं थोडं धडकी भरवणारं होतं. विर म्हणाला, “त्यांचा अनुभव इतका आहे की तुम्ही त्यांच्याशी जास्त बोलायलाही घाबरता. मी जवळपास 10 वर्षे आमिर सरांशी बोललो नव्हतो. मग मी त्यांना मेसेज केला आणि लिहिलं, ‘आमिर सर, मी तुम्हाला कॉल करू का?’ त्यांनी लगेच उत्तर दिलं, ‘हो, आत्ताच कॉल करा.’ आणि जेव्हा त्यांनी फोन उचलला, तेव्हा असं वाटलं जणू आम्ही दर आठवड्याला बोलत असतो.”

ब्रेकींग! भाजपशी युती करणं भोवलं अंबरनाथमध्ये नगरसेवकांना काँग्रेसने केलं निलंबित

यानंतर विरने सांगितलं की त्यांनी किती प्रामाणिकपणे आमिर खानसमोर आपल्या फिल्मची कल्पना मांडली. विर म्हणाला, “मी त्यांना सरळ सांगितलं, ‘सर, माझ्याकडे एक फिल्म आहे आणि मला हवंय की तुम्हीच ती बनवा. तुम्ही नाही बनवली तर दुसरा कोणीही बनवणार नाही.’ त्यावर त्यांनी सांगितलं, ‘ठीक आहे, पुढच्या आठवड्यात येऊन मला नैरेशन द्या.’ मी आजवर असा सुपरस्टार पाहिलेला नाही जो इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर भेटायला वेळ देतो. मी त्यांना नैरेशन दिलं आणि त्यानंतर आणखी नऊ वेळा नैरेशन झालं. त्यांची सर्वात मोठी चिंता नेहमी स्क्रिप्टबाबतच असते. नऊ नैरेशननंतर त्यांनी सांगितलं, ‘थोडे पैसे घेत जा आणि पाच सीन शूट करून दाखव.’ मग मी टेस्ट शूट केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, ‘गो ऑन फ्लोर्स.

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस ही फिल्म विर दास यांनी डायरेक्ट केली आहे. या चित्रपटात मोना सिंह, शरीब हाशमी आणि मिथिला पालकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version