ब्रेकींग! भाजपशी युती करणं भोवलं अंबरनाथमध्ये नगरसेवकांना काँग्रेसने केलं निलंबित

Congress च्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना भाजपशी युती करणं भोवलं आहे. कारण यावर आता प्रदेशाध्यक्षांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Congress 1

Congress suspends corporators in Ambernath over alliance with BJP : राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाने कुणाचाही हात हाती घेतल्याने मतदारांच्या भुवया उंचावत आहेत. त्यात अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मात्र थेट भाजप काँग्रेसची युती झाली होती. मात्र ही युती करणं काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना भोवलं आहे. कारण यावर आता प्रदेशाध्यक्षांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये नगरसेवकांना काँग्रेसने केलं निलंबित

काँग्रेसने या पदाधिकारी आणि नगरसेवकांना निलंबित करण्याचा आदेश काढला आहे. त्याचं एक पत्रक पक्षाकडून जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, प्रदीप पाटील अध्यक्ष, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत.

व्हेनेझुएलानंतर ट्रम्पची या पाच देशांवर वक्रदृष्टी! एक देश थेट ताब्यात घेण्याचा प्लानही तयार

मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे.ही बाब लक्षात घेता मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास कॉंग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. नोंद घ्यावी.

नवीन वर्षात मुक्ता बर्वेची प्रेक्षकांना खास भेट! 27 फेब्रुवारीला ‘माया’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दुसरीकडे विधानसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट ‘एमआयएम’शी आघाडी केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या युतीमुळे विधानसभेतील नाऱ्याचा भाजपलाच विसर पडला आहे का? असा प्रश्न भाजप अन् एमआयएमच्या अकोटमधील आघाडीमुळे उपस्थित केला जात आहे. अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली आहे. तर, दुसरीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमधील एमआयएमसोबतची कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नसून, ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाईचा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे.

follow us