Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे कायम त्यांच्या चित्रपटामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. आता नुकतंच ‘झी५’ या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवरती विवेक यांचा ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ (‘The Kashmir Files) ही वेब सीरिज रिलीज करण्यात आली. विवेक अग्निहोत्री यांना भरपूर वेळेस या सिनेमाबद्दल आणि काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल स्पष्टपणे भाष्य करत असल्याचे आपण बघितले आहे.
परंतु नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात काही सवाल विचारल्यावर विवेक अग्निहोत्रीने मुलाखतचं सोडून गेल्याचं बघायला मिळाले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा अगदी सुरुवातीपासून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि यावरून जोरदार टीका देखील झाली. नुकतंच या संदर्भामध्ये एका मुलाखतीच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांना काही सवाल करण्यात आले, यामुळे त्यांनी ती मुलाखत मध्येच बंद केल्याचे बघायला मिळाले आहे. सध्या त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.
This coward who couldn’t answer an interview completely, who ran away from it like his master did , who was caught lying when he said Government didn’t promote his film …is talking about courage !!!! #CowardAgnihotri pic.twitter.com/ZwQN57rmgl
— Sheryl Iona (@IonaSheryl) August 19, 2023
व्हिडीओमध्ये मुलाखत घेत असलेली महिला पत्रकार विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या सिनेमामुळे समाजातील काही विशिष्ट वर्गावर टीका होत असण्याबद्दल विचारत असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच यासोबत हा सिनेमा मुस्लिम विरोधी अजेंडा पसरवत असल्याचे देखील तिने नमूद केले आहे. पुढे तिने ‘द काश्मीर फाइल्स’ला भाजपाने पाठिंबा देण्यावर देखील विवेक अग्निहोत्री यांना सवाल विचारलं आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टपणे नकार दिल्याचे पाहायला मिळत आहे.
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, “देशातील ४ कोटी लोकांनी हा सिनेमा बघितला ते सगळे भाजपा समर्थक होते का? असं नाही ना… या देशातील प्रत्येक वर्गाने तो सिनेमा पाहिला आहे आणि प्रमोट केला आहे. आज देखील काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराबद्दल कुणीच भाष्य करत नाहीत. आमच्या सिनेमामुळे त्यावर लोक बोलत आहेत.” पुढे जेव्हा भाजपाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी सवाल करण्यात आला, तेव्हा मात्र विवेक यांनी मुलाखत मध्येच थांबवत तिथून काढता पाय घेतल्याचे बघायला मिळाले आहे.
विवेक यांच्या टीमने ही मुलाखत अचानकचं थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅमेरा सुरू असताना ते तिथून निघून गेल्याचे बघायला मिळाले. त्यावेळी ते त्या महिला पत्रकाराला म्हणाले की, “मला माहिती आहे तुम्ही नेमके कशासाठी आला आहात आणि तुमच्या सवालाचा रोख देखील मला चांगलाच धारदार आहे. याचा मला चांगलाच अनुभव आहे.” असं म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी तिथून काढता पाय घेतल्याचे बघायला मिळाले आहे.
त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काहींनी त्या महिलेची चूक दाखवून दिली आहे, तर काहींनी विवेक अग्निहोत्री यांना पळपुटा म्हणून त्यांच्यावर सडेतोड टीका करत असल्याचे बघायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्री हे लवकरच त्यांचा आगामी सिनेमा ‘द व्हॅक्सीन वॉर’ प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा छोटासा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.